कॉंग्रेसच्या मोर्चाने मूल शहर दुमदुमले Congress march in Mul

Congress march in Mul
Congress march in Mul

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार मार्चात सहभागी

मूल (प्रतिनिधी): शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेवुन राज्याचे विरोधी पक्ष नेते नामदार विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांच्या नेतृत्वात व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत Santosh Rawat यांच्या मार्गदर्शनात तालुका कॉंग्रेस पार्टीच्या वतिने कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामधुन हजारोच्या शेतकरी बांधवाच्या उपस्थितीत मोर्चा व आंदोलन करण्यात आले. यामोर्चामुळे मूल शहर दुमदुमले.Congress march in Mul

जिल्हयात रानटी डुक्करांकडुन शेतकऱ्यांचे पिक नष्ट होत आहे मात्र वनमंत्र्यांनी शेतकऱ्यांना साधे तारेचे कुंपन करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देत नसल्याने असा सरकारला त्यांची जागा दाखविण्याची आता वेळ आली आपल्यावर आली असल्याची प्रतिपादन नामदार वडेट्टीवार केलेे, धानाच्या किंती दिड पट करण्याचे आश्वासन देणारे सरकार 3 हजार रूपये सुध्दा भाव देऊ शकत नाही, जय श्रीराम म्हणणारेच आता जय श्रीराम धानाचे दर घसरविल्याची खोचक टिकाही यावेळी वडेट्टीवार यांनी केली. जिल्हयात वन्यप्राण्यांकडुन वारंवार हल्ले होत आहे, हल्लयात ठार झालेल्या कुटुंबियांना शासनाकडुन 50 लाख रूपये आर्थीक मदत देण्यात यावी व कटुंबियांना शासन सेवेत घेण्याची मागणी मोर्चाच्या माध्यमातुन केली.

हजारो शेतकरी बांधवाच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता सदर मोर्चा प्रशासकीय भवनाजवळ पोहचला, यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत, युवक कॉग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवाणी वडेट्टीवार Shivani Wadettiwar , मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार Rakesh Ratnawar यांनी मार्गदर्शन केले. मोर्चाचे निवेदन उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यांच्याकडे देण्यात आले.

मोर्चा प्रशासकीय भवनासमोर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यासभेचे संचालन तालुका कॉग्रस कमेटीचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले यांनी केले तर उपस्थितांचे आभार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल शेरकी यांनी मानले. मोर्चात हजारो शेतकरी, युवक युवती सहभागी झाले होते. यावेळी कुठलीही अनुचित घटना घडु नये यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.