शेळयांना बिल्ले मारल्याने जंतु पडुन 2 शेळयांचा मृत्यु 2 goats died

2 goats died
2 goats died
  • पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची पशुपालकाची मागणी

मूल (प्रतिनिधी) : पावसाळाच्या दिवसात पाळीव शेळयांना चुकीच्या पध्दतीने आधार क्रमांक बिल्ले पशुवैद्यकीय अधिकाऱ्यानी मारल्याने शेळयांना जंतु पडुन मृत्युमुखी पडल्याची तक्रार पशुपालक विजय मुर्लीधर बावणे यांनी मूल पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे केली असुन सदर प्रकरणाची चौकशी करून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदगिरवार यांच्यावर कारवाई करण्यात यावी व आर्थीक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. 2 goats died

 2 goats died1
2 goats died1

मूल तालुक्यातील मौजा चिमढा Chimdha येथे मोठया प्रमाणावर पशुपालक जनावरे पाळतात, चिमढा येथील विजय मुर्लीधर बावणे हे शेळया पाळतात त्यांच्या शेळयांना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदगिरवार Dr. Nandgirwar यांनी भर पावसाळयात शासनाकडुन आलेले बिल्ले मारले आणि त्यासोबतच अनेकांच्या शेळयांना बिल्ले मारले. डॉ. नंदगिरवार यांनी बिल्ले मारल्यावर शेळयांना जखमा झाल्या व जखमांवर जंतु पडले, याबाबत डॉ. नंदगिरवार यांच्याशी संपर्क साधुन जंतु पडल्याची माहिती विजय बावणे यांनी दिली मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवुन मी काय करू अशा पध्दतीने बोलत असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.

शेळी ही अत्यंत नाजुक प्राणी असुन पावसाळयाच्या दिवसात छोटीशी जखम सुध्दा ती सहन करू शकत नाही ही बाबत माहिती असतांनाही चक्क पावसाळयात शेळयांना बिल्ले मारल्याने 2 शेळया मृत्युमुखी पडल्या असुन झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी विजय बावणे यांनी पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे केली असुन सदर प्रकरणाची चौकशी करून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदगिरवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

बिल्ले मारल्याने नव्हे तर आजाराने शेळया दगावल्या: डॉ. नंदगिरवार
शेळयांना बिल्ले मारून जवळपास अडीच महिणे लोटुन गेले, दरम्यानच्या काळात कोणाचीही तक्रार नव्हती, विजय बावणे यांच्या शेळीला जंत पडले म्हणुन फोन केले, त्यांना दवाखान्यात घेवुन येण्यासाठी सांगीतले परंतु त्यांनी चिमढा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात न आणता मूल येथे घेवुन गेले, सदर शेळयांचा मृत्यु हा बिल्ले मारल्याने नव्हे तर आजारी असल्याने दगावल्याची प्रतिक्रिया पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदगिरवार यांनी दे धक्का एक्सप्रेसला दिली.