तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश
मूल (प्रतिनिधी) : येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश येसनकर यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मूल शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी सदर निवड केली असुन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्हयाचे संपर्कमंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. Selection of Akash Yesankar as Mul city president of NCP
मूल तालुक्यातील विविध समस्यांना वाचा फोडणारे, वेळप्रसंगी आंदोलनात्मक भुमिका घेवुन अन्यायग्रस्ताना न्याय मिळवुन देणारे आकाश येसनकर यांच्या कार्याची दखल घेवुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी त्यांना मूल शहराध्यक्षपदी निवड केली. तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी त्यांच्या नावाची जिल्हाध्यक्षांकडे शिफारस केली होती, त्यांनुसार त्यांची निवड केली असुन त्यांना नामदार आत्राम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
चंद्रपूर येथील विश्राम गृहात पार पडलेल्या एका छोटयाखानी कार्यक्रमात सदर नियुक्तीपत्र देण्यात आले असुन यावेळी मूल तालुक्यातील शेकडो युवा कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केले. यावेळी सर्वांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दुप्पटे खांदयावर ठेवुन नामदार आत्राम यांनी स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, प्रदेश सचिव आबिद अल्ली, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, मूल तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार उपस्थित होते.