ना. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाला यश
मुल (प्रनिनिधी) : खरीप हंगाम धान 2023-24 मधिल उत्पादीत धान लवकरच काढणीला सुरूवात होणार आहे. मात्र मूल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान खरेदीसाठी नोंदणी केंद्राला मंजुरी प्राप्त झालेली नसल्याने बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी विरोध पक्षनेते नामदार विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांना माहिती देऊन नोंदणी केंद्राला मंजुरी मिळवुन देण्याची मागणी केली होती, मागणी गंभीर दखल घेत जिल्हा मार्केटींग अधिकारी चंद्रपूर यांचेकडुन तात्काळ नोंदणी केंद्राला मंजुरी मिळवुन दिली. Approval of registration center for purchase of paddy
काही दिवसांवर नविन हंगामातील धान विक्रीसाठी बाजार समिती परिसरात आणला जातो, सदर माल बाजारपेठेत शासकीय हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्या जात असल्याने शेतकÚयांना आर्थीक भुर्दंड सहन करावा लागते. दरम्यान शासकीय हमीभाव केंद्रावर धान विक्री केल्यास शेतकÚयांचा फायदा होतो, यामुळे मूल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान खरेदीसाठी केंद्राला मंजुरी देण्याची मागणी सभापती राकेश रत्नावार यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली होती, सदर मागणी दखल घेत जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रपूर यांचे कडून १३ ऑक्टोंबर रोजी पत्र क्रमांक ६५५/२०२३-२४ नुसार मंजुरी मिळवुन घेतली. यामुळे आता मूल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय हमीभाव केंद्रावर विक्रीची नोंदणी सुरू होणार असल्याने, मूल तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. यावर्षी शासकीय हमीभाव दराने खरेदी होणार असून धान विक्रीची नोंदणी सुरू केली जाणार आहे. जेव्हा धान काढणीची वेळ येईल तेव्हा नोंदणी करावी की, शेतीचे कामे करावे. तसेच, नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांला स्वतः उपस्थिती राहावे लागणार आहे.
शेतकÚयांच्या हिताची मागणी नामदार विजय वड्डेट्टीवार यांनी मंजुर करून दिल्याबद्दल मूल बाजार समिती पदाधिकाÚयांनी आभार मानले आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, माजी सभापती तथा संचालक घनश्याम येनुरकर, संचालक अखिल गांगरेड्डीवर, राहुल मुरकुटे, सरपंच चांगदेव केमेकार, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवारर्, खरेदी विक्री सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुरसे, संचालक हसन वाढई, विनोद कामडी उपस्थित होते.