वनमंत्री आणि उपसंचालकांना दिले निवेदन
मूल (प्रतिनिधी) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प Tadoba Andhari Tiger Reserve लगतच्या मारोडा गावाजवळील हजारो हेक्टर शेती जंगलाला लागुन आहे. सध्या शेतात उभे पिके असुन लवकरच काढणीला येणार आहे परंतु मागील काही दिवसांपासुन रानटी डुक्करांचा हैदौस वाढल्यामुळे संपुर्ण पिके नष्ट होत असुन लाखो रूपयांची नुकसान होत आहे, यामुळे शासनाने रानटी डुक्कराचा बंदोबस्त करून एकरी 40 हजार रूपये नुकसान भरपाई दयावे अशी मागणी मारोडा परिसरातील शेतकऱ्यांनी राज्याचे वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) यांना निवेदन देवुन तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. 40,000 rupees per acre should be compensated by settling the wild boar
मूल तालुक्यातील मारोडा परिसराला लागुनच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मोठे जंगल आहे, याजंगलात मोठया प्रमाणावर वन्यप्राण्यांचा वावर आहे. शेताची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अनेक शेतकरी शेतमजुरांचा वन्यप्राण्यामुळे जिवही गमवावा लागला, यापरिसरातील अनेक शेतकऱ्यांचे केवळ शेतीच्या उत्पन्नावरून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे परंतु गेल्या काही वर्षापासुन शेतकऱ्यांचे उभे पिक वन्यप्राण्यांनी नष्ट करीत असल्याने शेतकरी आर्थीक संकटात सापडला असुन पिकाचे उत्पादन घेण्यासाठी घेतलेले पिक कर्ज, बचत गटाच्या माध्यमातुन घेतलेले कर्ज फेडायचे कसे अशा विवंचनेत येथील शेतकरी सापडला आहे. याबाबत स्थानिक वनाधिकाऱ्यांना तोंडी माहिती देवुन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी शेतकऱ्यांनी वनमंत्र्यांना व उपसंचालकांना निवेदन देवुन आपली समस्या त्यांच्यापुढे मांडली. Pay compensation for crop damage
वन्यप्राण्यामुळे वारंवार पिकांची नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी रानटी डुकरांचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी किंवा सरसकट शेतकऱ्यांना बंदोबस्त करण्यासाठी मार्ग खुला करूण देण्यात यावा, पिके कसे वाचवायचे हा निर्णय आम्ही घेवु मात्र शेतकऱ्यांवर कोणताही कायदा लावु नये असा पर्यायही शेतकऱ्यांनी निवेदनातुन प्रशासनाला सुचविलेला आहे.
उभ्या पिकांची झालेली नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून एकरी 40 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी प्रशांत मेश्राम, अशोक पुल्लावार, निरंजन वाळके, बंडु गेडाम, वामनराव पिंपळे, शालीक गुरनुले, रमेश मुरस्कर, सुरेश नन्नावरे, मुखरू मांदाळे, चरणदास देवतळे, सुदेश निमगडे, मनोहर अल्लीवार यांनी निवेदनातुन केली आहे.