मूल (प्रतिनिधी): शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधून घ्यावे लागते. शेती, शेतकरी आणि शेतमालाला भाव हा मोठा गहन विषय आहे. मीडीयाच्या माध्यमातून हा आवाज बुलंद झाला पाहिजे. त्यामुळे पत्रकारांनी शेती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे मोठया गांभिर्याने बघावे असे मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले. व्हाईस ऑफ मीडीयाच्या वतीने आयोजित पत्रकारांच्या एक दिवशीय कार्यशाळा व मान्यवरांचा गौरव सोहळा कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात रविकांत तुपकर बोलत होते. Voice of Media
मूल येथील कर्मवीर स्व. मा. सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृहात दोन आक्टोबर रोजी हा सोहळा पार पडला. एक दिवशीय कार्यशाळेसाठी विदर्भ विभागीय पदाधिकारी आणि चंद्रपूर-गडचिरोली जिल्हयातील पत्रकार उपस्थित होते.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रविकांत तुपकर, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे विधीज्ञ अॅड.रितेश टहलियानी, जेष्ठ पत्रकार सुनिल कुहीकर, आनंद आंबेकर उपस्थित होते.
शेतक-यांच्या समस्या आणि पत्रकारांची भूमिका या विषयी बोलताना तुपकर म्हणाले.पत्रकारितेत गावाचा विचार झाला पाहिजे.पूर्व विदर्भातील धान उत्पादकांच्या समस्या विषयी आपल्या भागात धानाचे मोठे आंदोलन उभारायचे आहे. पत्रकार आणि कायदा या विषयावर बोलताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे विधीज्ञ अॅड. रितेश टहलियानी म्हणाले की, विविध कायदयाच्या रूपाने पत्रकारांना संरक्षण मिळाले आहे. पत्रकारांनी सुदधा कायदयाच्या चौकटीत राहून आपली पत्रकारिता करावी असा सल्ला अॅड. रितेश टहलियानी दिला. यावेळी आनंद आंबेकर यांचेही मार्गदर्शन लाभले. देशभरात व्हाईस ऑफ मीडीयाची सदस्य संख्या 37 हजाराच्या वर झाल्याने एक दिवस गिनीज बुक ऑफ रेकार्ड मध्ये व्हाईस ऑफ मीडीयाचे नाव नेण्यास वेळ लागणार नाही असे मत समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी व्यक्त केले.यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमाचे संचालन जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी आभार कार्याध्यक्ष गुरू गुरनूले यांनी मानले. कार्यशाळेच्या दोन्ही सत्रामध्ये उपस्थित मान्यवरांचा गौरव चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आ.प्रतिभाताई धानोरकर, कॉग्रेस नेते विनोद दत्तात्रय, राष्टीय अध्यक्ष संदीप काळे, राष्टीय कार्याध्यक्ष सुनिल आवटे, राज्य संघटक सुनील कुहीकर, आनंद आंबेकर, मंगेश खाटिक, रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, संजय पडोळे, व्यंकटेश दडमवार, प्रकाश कथले, अॅड.रितेश टहलियानी या गौरवमूर्तीचा सत्कार करण्यात आला. एक दिवशीय पत्रकार कार्यशाळा स्व.खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आली होती. कार्यशाळेला चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयातील तसेच विदर्भातील पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमानंतर उपस्थित पत्रकारांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी व्हाईस आफ मीडीयाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.