अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
मूल (प्रतिनिधी) : राज्यात बंदी असलेल्या सुगंधीत तबाखु व गुटखा मूल तालुक्यात सर्रास विक्री केली जात आहे मात्र अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्याप्रती तिव्र रोष व्यक्त केल्या जात आहे. Aromatic tobacco business is booming in Mul taluka
झटपट पैसे कमाई करण्याच्या लोभापाई युवकांना अक्षरशः विष खाऊ घालणाÚया सुगंधीत तंबाखु माफियांकडुन राज्याने बंदी घातलेल्या सुगंधीत तंबाखुची सर्रास विक्री होत आहे, तालुक्यातील अनेक दुकानांमध्ये मूलच्या सुगधीत तंबाखु माफियांकडुन पुरवठा केला जात असतांनाही त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन कारवाई का करीत नाही हा चिंतनाचा विषय ठरला आहे. Neglect of Food and Drug Administration and Police Administration
मूल शहरातील गोळया बिस्किटच्या 2 दुकानदाराकडुन सुगंधीत तबाखुची तालुक्यात तस्करी केल्या जात असल्याची खमंग चर्चा मूल शहरात आहे, चंद्रपूर येथील जयसुख आणि वसिम नामक सुगंधीत तंबाखु माफिया मूल येथील तिन ते चार तस्करांना सुगधीत तंबाखुचा पुरवठा करीत आहेत, त्यांच्या मार्फतीने मूल तालुक्यात अवैध सुगधींत तंबाखु विक्री केली जात आहे, तालुक्यातील अल्पवयीन मुले, विद्यार्थी, तरूण वर्ग मोठया प्रमाणावर सुगंधीत तंबाखुच्या आहारी जात असल्याने त्यांचे आरोग्य खराब होऊ लागले आहे.
लोकांच्या शरीरात विष पेरणाऱ्या आणि लोकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या सुगंधित तंबाखु माफियावर कारवाई होईल का? झोपी गेलेल्या अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन या दोनही विभागाला जाग येईल का? सुगंधित तंबाखु आणि गुटखाबंदी कायदा केवळ नावापुरताच असल्याचे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिसून येत आहे, दररोज हजारो लोकांच्या शरीरात विष पेरणाऱ्या सुगंधित तंबाखु माफियांवर अंकुश कोण लावणार असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे.