शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते यांची मागणी
चंद्रपूर (प्रतिनिधी) : जिल्हयात शासकीय तांदुळ तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, अलिकडेच वरोरा तालुक्यातुन शासकीय तांदुळाची तस्करी होताच शेगाव पोलीसांनी आरोपीला पकडुन गुन्हा दाखल केला होता, यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष, तथा वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन मत्ते Nitin Matte यांनी जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. Government rice smuggling
वरोरा तालुक्यातील माढेळी येथील एका व्यापाऱ्याला शासकीय योजनेतील तांदुळ तस्करी करतांना अलिकडेच पोलीसांनी अटक केली होती. सदर व्यापान्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये गोडाऊन किरायाणे घेऊन तिथे तो स्वस्त धान्य दुकान व शालेय पोषण आहार योजनेतील तांदूळ साठवून ठेवत होता आणि त्याची तस्करी जिल्हा आणि जिल्हा लगतच्या राईस मिल तसेच परप्रांतात करीत होता. मागील अनेक वर्षांपासून हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू होता. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकारी व पदाधिकान्यांच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही हा एक संशोधनाचा विषय आहे. माढेळी परिसरात तांदूळ उत्पादक शेती शेतकरी नाही. तसेच त्या जातीच्या तांदळाचे उत्पादन माढेळीत नव्हे तर जिल्ह्यात कुठेच होत नाही. तेव्हा त्या ठिकाणी शासकीय योजनेतील तांदूळ खरेदी दाखवून त्याचा बाजार समितीने शेष घेतलेला आहे. यामुळे बाजार समितीची भूमिका सुद्धा संशयास्पद आहे. Set up SIT to probe government rice smuggling
शासकीय योजनेतील तांदूळ तस्करीचे प्रकरण अलीकडेच उघडकीस आले असल्याने आणि यात पुरवठा निरीक्षक पासून स्वस्त धान्य दुकानदार तसेच शालेय पोषण आहार योजनेतील काही शाळांचे मुख्याध्यापक आणि पुरवठादार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आणि पदाधिकारी अशी मोठी साखळी समाविष्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.. सदर प्रकरणाची चौकशी करिता एसआयटी स्थापन करून दोषींवर कारवाई. करावी अशी मागणी नितीन मत्ते यांनी केली आहे.