चंद्रपूर (प्रतिनिधी) : शासकीय सेवेत असलेला कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून गावात सर्रास दारुविक्री करीत होता. यामुळे गावातील युवा वर्ग व्यसनाच्या अधीन जात असल्याचे चित्र बघून गावातील संतप्त महिलांनी स्वतः या व्यक्तीच्या घरी जाऊन पोलिसांना दारू पकडून दिली. मात्र पोलिसांनी उलट याच महिलांविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Cases have been filed against women who caught alcohol
गोंडपीपरी तालुक्यात गोजोली Gojoli हे गाव आहे. येथील पोस्टमन गेल्या अनेक वर्षांपासून सर्रासपणे दारुविक्री करीत आहे. यामुळे गावातील युवा वर्ग व्यसनाकडे वळत असून यामुळे सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे. यामुळे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी संतप्त झालेल्या महिलांनी धाबा पोलीस स्टेशन Dhaba Police Station गाठत ठाणेदार गोरक्षनाथ नागलोट यांना दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली, मात्र पोलिसांनी आपण दारू पकडा आम्ही कारवाई करतो असे सांगितले. त्यामुळे महिलांनी दारूविक्रत्यांच्या घराकडे मोर्चा वळवला. यावेळी दारूविक्रेत्यानेे रोजंदारी करणारा व्यक्ती तुमराम राहत असलेल्या खोलीत दारूच्या पेट्या आढळल्या. याची माहिती पोलिसांना दिली. दारूच्या 100 बाटल्या तिथे सापडल्या मात्र पोलीस पंचनामा न करता दारूविक्रेत्यांना घेऊन जात होते, यावेळी संतप्त महिलांनी आक्षेप घेतल्यावर अखेर पंचनामा करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) आणि 83 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांनी जबाबदार नागरिकाची भूमिका बजावली असताना आरोपीने खोटे आरोप करीत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी महिलांविरोधात भादवी कलम 143, 147, 149, 323, 504, 506, 427 अंतर्गत गुन्ह्यांची नोंद केली.Crimes filed against women
गावातील जागरूक नागरिकांना असा त्रास दिला जात असेल तर सामान्य नागरिकांनी करायचे तरी काय असा प्रश्न नागरीकांना पडला आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे त्वरित लक्ष घालून याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी निवेदनातुन केली आहे.
जातीय रंग देण्याचा प्रयत्न
गावातील महिला ह्या मागासवर्गीय आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय महिलांचा समावेश आहे असे असताना आरोपीकडून याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे, यावेळी डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. महिलांची व ग्रामस्थांची दिशाभूल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी गावातील माया आत्राम, ग्रामपंचायत सदस्य सरस्वती आत्राम, माजी सरपंच उज्वला दुर्गे, मंगला कोकोडे, नलिनी कोटरंगे, सारिका कोटनाके, शिलिनी डोंगरे, वांदुशा सोनुले, कांता निवळकर, सुरेंद्र मांदाडे, रामदास ठाकरे, रामदास चौधरी, संजय चौधरी, राकेश प्रधाने, राजेश डोंगरे यासह ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते