सुधाकर दुधे, सावली
नहराच्या पाईपलाईनच्या समस्या संदर्भातील शेतीच्या पाण्याच्या ज्वलंत समस्या मार्गी लावण्याची मागणी गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांच्याकडे केली होती, दरम्यान शेतकऱ्याच्या शेतीच्या पाण्यासंबंधी आसोलामेंढा नुतनीकर विभागातील अधिकाऱ्याना चांगलेच खडसावले. आणि येत्या काही दिवसात पाण्याची समस्या तात्काळ सोडविण्याचे आदेश दिले. Officials were rebuked by MP Nete
गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते मागील दोन दिवस सावली Saoli येथे मंजुर झालेल्या जनसुविधेअंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन करिता दौऱ्यावर आले असता दरम्यान व्याहाड बुज, सामदा बुज. सोनापुर, कोंडेखल, घोडेवाही येथील शेतकऱ्यानी नहराच्या पाईपलाईन संबंधित समस्या सोडविण्याची मागणी रेटुन धरली. शेतकऱ्याच्या रास्त मागणी संदर्भात खा. नेते यांनी शनिवारी सावली येथील गोसेखुर्द विश्रामगृहात अधिकाऱ्याची बैठक घेवुन पाण्याची समस्या तात्काळ सोडविण्याचे आदेश दिले.
सदर बैठकीला उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, भाजपाचे तालुकाध्यक्ष अविनाश पाल, सावलीचे नगरसेवक तथा भाजपाचे महामंत्री सतिश बोम्मावार, सावलीचे तहसिदार परिक्षित पाटील, संवर्ग विकास अधिकारी वासनिक, तालुका कृषी अधिकारी अश्विनी घोडसे, वनपरिक्षेत्राधिकारी नायगमकर, पाटबंधारे कार्यकारी अभियंता हितेश लाडे, महावितरणचे उपविभागीय अभियंता महाडोळे, सिंचाई प्रकल्पाचे पिसाड, भाजपा जेष्ठ नेते देवराव मुद्दमवार, प्रकाश पा.गड़्डमवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्षा विनोद धोटे, शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, कविंद्र रोहणकर, मोतीराम चिमुरकर, सरपंच नितीन कारडे, सोशल मिडिया चे राकेश कोंनबतुलवार, उपसरपंच नरेश बाबणवाड़े, निखिल सुरमवार, उपस्थित होते.