शिबीराचा नागरीकांनी लाभ घ्यावा, संतोषसिंह रावत यांचे आवाहन
मूल (प्रतिनिधी) : श्री मॉ दुर्गा मंदिर सेवा समिती मूल आणि संतोषसिंह रावत मित्र परिवार मूलच्या वतीने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था सावंगी मेघे, जनरल मेडीकल प्रॅक्टीशनर असोसिएशन मूल आणि सावली, केमीस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशन मूल आणि चंद्रपूर जिल्हा मेडीकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनच्या सहकार्याने कार्ये जनकल्याणकारी, सामान्य जनतेच्या दारी हे ब्रिद डोळयासमोर ठेवून रविवार दिनांक 20 आँगस्ट 2023 रविवारला नव भारत विद्यालय मूल येथे मोफत आरोग्य तपासणी, औषध वितरण आणि रक्तगट तपासणी शिबीर आयोजीत करण्यांत आला आहे. Health screening and medicine distribution camp
आयोजीत शिबीरात आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालय सावंगी मेघे येथील जनरल फिजीशियन, बालरोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, दंत रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि त्वचारोग तज्ञ रूग्णांवर विनामूल्य उपचार करणार असून शिबिरात ब्लड प्रेशर, ई.सी.जी. मेमोग्राफी, ब्लड शुगर, सर्व प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या, गर्भवती माता व स्तनदा मातांची तपासणी, सिकलसेल चाचणी, बाहय रूग्ण सेवा आणि त्वचा आजावर वैद्यकिय सुविधा आणि विरोधी पक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी तयार केलेले फिरते कॅन्सर रूग्णालय बाहय रूग्णांच्या सेवेकरीता उपलब्ध राहणार आहेत.
शिबीरात आरोग्य तपासणी सोबतचं पात्र लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना, ई गोल्डन कार्ड, आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड सुध्दा काढण्यांत येणार असून शिबिरामध्यें डेंग्यु, क्षयरोग, मधुमेह, कॅन्सर आदि विविध आजारांची माहिती पत्रक तसेच आजाराबाबतची जनजागृती तसेच समुपदेशन करण्यांत येणार आहे. आयोजीत शिबिरात दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत मेडीकल लेबॉरेटरी टेक्नालॉजीस्ट असोसिएशनच्या सहकार्याने विनामूल्य रक्तगट व सिकलसेल तपासणी करून मिळणार आहे. परिसरातील गरजु नागरीकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सेवा उपलब्ध व्हाव्या. या उद्देशाने आयोजीत करण्यांत आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचा नागरीकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन शिबिराचे मुख्य संयोजक दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे Dr. Abhyudaya Meghe आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा मॉ दुर्गा मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत Santoshsinh Rawat यांनी केले आहे.
कार्ये जनकल्याणकारी, सामान्य जनतेच्या दारी हे ब्रिद डोळयासमोर ठेवून 20 आँँगस्ट रोजी आयोजीत करण्यांत आलेल्या आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, यासाठी संतोषसिंह रावत मित्र परीवारातील सर्व सदस्य उत्साहाने कामाला लागले असून युवक आणि महिला कार्यकर्ते घरोघरी जावून युध्दपातळीवर शिबिराचा प्रचार करीत आहेत.