शासनाने घेतला निर्णय
मूल (प्रतिनिधी): येथील 50 खाटाच्या उपजिल्हा रूग्णालयाला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी शासनाने मान्यता दिली असुन यामुळे मूलच्या उपजिल्हा रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. Mul Sub District Hospital
मूल येथील ग्रामीण रूग्णालयाचे रूपांतर 50 खाटांच्या श्रेणीवर्धन उपजिल्हा रूग्णालयात 2005 मध्ये करण्यात आले होते, दिवसेंदिवस उपजिल्हा रूग्णालयात रूग्णाची संख्या वाढत असल्याने 100 खाटांच्या श्रेणीवर्धन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. अखेर 3 ऑगष्ट रोजी शासनाने विशेष बाब Special case म्हणुन मूलच्या उपजिल्हा रूग्णालयाला 100 खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रूग्णालय म्हणुन शासन निर्णयाव्दारे मान्यता दिलेली आहे.
सदर श्रेणीवधीत १०० खाटाांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी विहीत पध्दतीने जागा अधिग्रहीत करुन बाांधकाम व पदनिर्मिती करण्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे. शासनस्तरावर अनेक दिवसांपासुनची प्रलंबित असलेली मागणी जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे वन, सांस्कृतीक कार्य आणि मत्स्य व्यवसायमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळै अखेर शासनाने सदरची मागणी मान्य केल्याबद्दल मूल तालुक्यातील नागरीकांनी नामदार सुधीर मुनगंटीवार Namdar Sudhir Mungantiwar आणि शासनाने आभार मानले आहे.
मूलच्या उपजिल्हा रूग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक आणि तज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्याची नियुक्त करण्यात यावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे.