तालुक्यातील शेकऱ्यांचे भीषण वास्तवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
आशिष कावटवार, पोंभूर्णा
राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एका रुपयात पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. विमा कंपनीला अर्ज भरण्याची फी म्हणून एका अर्जापोटी ४० रुपये ‘आपले सरकार सेवा केंद्रांना देण्यात येणार आहे. तरीही सेवा केंद्रचालकांकडून शंभर ते दोनशे रुपये घेऊन शेतकऱ्यांची लूट करीत आहे.आधीच अतिृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे आणि दुसरी कडे आपले सरकारच तर करत नाही नसेल ना शेतकऱ्यांची लूट असा आक्रोश शेतकऱ्यांतून बोलल्या जात आहे. Robbery of farmers by taking one hundred to two hundred rupees from the service center manager
राज्यात एक रुपयात पीक विमा योजनेची अंमलबजावणी २६ जूनपासून सुरू झाली आहे. विम्यासाठीचे अर्ज आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून भरले जात आहेत. राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार पीकविम्याचा अर्ज भरण्याचा खर्च म्हणून प्रत्येक अर्जापोटी ४० रुपये विमा कंपनी ‘आपले सरकार’ सेवा केंद्राला देणार आहे. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये पुरेशी स्पष्टता असतानाही परिसरातील ‘आपले सरकार केंद्रचालकांकडून मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जात आहेत. पोंभूर्णा, देवाडा खुर्द, चिंतलधाबा, उमरी पोजदार,नवेगाव मोरे सह परिसरातील शेतकऱ्यांकडून १०० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत अधिकचे पैसे घेतले जात आहे. त्यामुळे तालुका प्रशासनानी सेवा केंद्रांची नियमित तपासणी करावी. अतिरिक्त पैसे घेणाऱ्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रचालकावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पीकविम्याकडे अनेकांनी फिरविली पाठ
शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरविली आहे. गत दोन-तीन वर्षे शेतकऱ्यांना अपेक्षित पीकविमा मिळाला नाही. त्यात अनेक केंद्रचालकांकडून होणारी लूट यामुळे शेतकरी पीकविमा भरण्याकडे पाठ फिरविताना दिसून येत आहे.
तक्रार करा, कारवाई करू: : तहसीलदार
शेतकरी वर्गात जनजागृती केली जात आहे. कुणीही अतिरिक्त शुल्क देऊ नये, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या केंद्राची तक्रार करावी. दोषींवर नक्कीच कारवाई करू, अशी प्रतिक्रिया तहसीलदार शिवाजी कदम यांनी दिली आहे.