कोरपणा (प्रतिनिधी) : सततची नापिकीमुळे आर्थीक विवचनेत सापटलेल्या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी 7 वाजता दरम्यान उघडकीस आली. संभा गणु कोडावे वय 54 वर्षे असे मृतक शेतकऱ्याचे नांव आहे. farmer committed suicide by hanging himself
कोरपणा तालुक्यातील निमणी येथील शेतकरी संभा गणू कोडापे वय ५४ यांचेकउै स्वतःच्या मालकीची ३ एकर शेती आहे. सदर शेतात कापूस सोयाबीन पिक घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, मात्र गेल्या काही वर्षापासुन सततची नापिकी दुबार पेरणी आर्थिक संकट पिकाला भाव नाही व कर्जाच्या विवंचनेतून शेतकरी संभा कोडापे यांनी निमणी बाखर्डी मार्गावरील प्रभाकर भोंगळे यांच्या शेताजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केले.
संभा कोडापे हे मागील काही दिवसांपासून चिंतेत होते त्यांच्यावर दुबार पेरणी सुद्धा करावी लागली तेव्हा बँकेचे कर्ज व समोरील शेती कशी करायची हा प्रश्न निर्माण झाल्याने शेवटी त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली
मृतकाच्या मागे पत्नी एक मुलगा आई भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे या घटनेमुळे निमणी गावात शोककळा पसरली असून रविवारला दुपारी ३ वाजता मालटोकणी नाल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले