मूल तालुक्यातील चिमढा येथील घटना
मूल (प्रतिनिधी) : शेतात उगविलेला मशरूम घरी आणुन भाजी बनवुन खाल्याने तिन जणाना विषबांधा झाल्याची घटना मूल तालुक्यातील चिमढा Chimdha येथे शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. वर्षा विशाल मांदाडे वय 28 वर्षे, रूतुजा प्रवेन्द्र मोहुर्ले वय 14 वर्षे आणि विहाण विशाल मांदाडे वय 8 वर्षे असे विषबांधा झालेल्यांची नांवे आहेत.
मूल तालुक्यातील मौजा चिमढा येथील विशाल मांदाडे Vishal Mandale यांच्या कुटुंबियांनी शेतातील उगविलेले मशरूम घरी आणुन त्यांची भाजी बनविले, शनिवारी सकाळी त्यांची पत्नी वर्षा विशाल मांदाडे वय 28 वर्षे, विहान विशाल मांदाडे वय 8 वर्षे आणि घराशेजारी राहणाÚया रूतुजा प्रवेंद्र मोहुर्ले वय 14 वर्षे यांना भाजी दिल्याने हया तिघांनीही जेवन केल्यानंतर काही वेळात उलटया होत असल्याने त्यांना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात Sub District Hospital उपचारार्थ दाखल केले. मूल येथे प्राथमिक उपचार करून त्यांना चंद्रपूर रेफर करण्यात आले आहे. Three people were poisoned
रूतुजा मोहुर्ले ही गडचिरोली जिल्हयातील पोटेगांव येथील रहिवासी असुन शिक्षण घेण्यासाठी चिमढा येथील आजोबा बोळण लोनबले यांच्या घरी राहात होती हे विशेष