मूल येथील घटना : जागेचा वाद गेला विकोपाला
मूल (प्रतिनिधी): घराच्या समोरील रस्त्यावर चारचाकी वाहन उभे करून, रस्ता अडविल्यामूळे झालेल्या वादात मूल येथील व्यापारी पितापुत्रावर फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून मूल पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवन्ये नुकताच गुन्हा दाखल केला आहे.. molestation has been filed against father and son
चंद्रपूर मार्गावरील शासकीय खुल्या पटागणावर लहान मुले खेळतात, याठिकाणी डुक्करांचाही मोठया प्रमाणावर वावर आहे, यामुळे यापरिसरात घाणीचे साम्राज्य पसरून आरोग्यावर परिणाम पडु नये यासाठी घराशेजारी एका इसमाने सदर जागेवर तारेचे कुंपण तयार केले, यामुळे घराशेजारी राहणाऱ्या मनोज अग्रवाल यांनी नेहमीच शाब्दिक वाद करीत होते, येण्या जाण्याच्या रस्त्यावर नेहमीच चारचाकी वाहन उभे ठेवुन नाहक त्रास देण्याचा प्रयत्न अग्रवाल कुटुंबियांकडुन होत होता, दरम्यान 16 जुर्ले रोजी सदर इसम आणि त्याची पत्नी हे बाहेरून घरी येत असता घराच्या समोरील रस्तावर अग्रवाल यांची टाटा पिकअप ही चारचाकी वाहन रस्त्यावर उभी करून ठेवल्याने ती बाजुला करण्याची विनंती वाहन चालकाला केली, वाहन चालक वाहन बाजुला करीत असतानाच मनोज अग्रवाल आणि शुभम अग्रवाल याने रस्त्यावर येवुन सदर व्यक्तील अश्लील शब्दात शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली, पत्नीने पतीला मारहाण करतील याभितीने ति सोडविण्यासाठी गेली असता तिलाही अश्लील शिवीगाळ करून अचानक हात पकडला यामुळे हाताला दुखापत झाल्याचे फिर्यादीत महिलेने म्हटले आहे.
महिला फिर्यादीच्या तक्रारीवरून मनोज अग्रवाल आणि शुभम अग्रवाल यांच्याविरोधात मूल पोलीस स्टेशन येथे भादवी 354, 509, 294, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजुनही अटक झालेली नाही. सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे आणि पोलीस निरीक्षक सुमित परतेकी करीत आहे.