इंडीगो आणि टाटा एसचा अपघात : 3 जण जखमी IndiGo Car and Tata S accident

IndiGo Car and Tata S accident
IndiGo Car and Tata S accident

चिमूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुक्ताबाई येथे इंडिगो कारने जात असताना विरूध्द दिशेने येणाÚया मालवाहक टाटा एस वाहनाच्या वाहनचालकामध्ये समोरासमोर झालेल्या टक्करमध्ये तिन ते चार जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील पेंढरी-मोटेगांव जंगल परीसरात रविवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. IndiGo Car and Tata S accident

सध्या पावसाचे दिवस सुरू असुन प्रत्येकच जण पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटन स्थळाकडे जाण्यासाठी निघत आहे, सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथील काही महिला पुरूष इंडीगो कार घेऊन मुक्ताबाईला जात होते. तर विरूध्द दिशेने येणाÚया मालवाहक टाटा एस क्रं. एम. एच. ४०, सी.एम.2629 च्या वाहन चालकांचे व कारच्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पेंढरी-मोटेगांवच्या जंगल परिसरात समोरासमोर टक्कर झाली. याअपघातात इंडीगो कार रस्त्याच्या पलीकडे पलटी झाली. अपघातात तीन -चार व्यक्ती जखमी झाले.

चिमूर पोलीस स्टेशनला या घटनेची माहीती होताच चिमूर पोलीस घटना स्थळी पोहचले.पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.