तालुक्यात अवैध सुगंधीत तंबाखु विक्रीचा गोरखधदा सुरूच
मूल (प्रतिनिधी) : शासनाने सुगंधीत तंबाखुवर बंदी घातली असतानाही मूल तालुक्यात खुलेआम सुगंधीत तंबाखु विक्री केली जात आहे, याअवैध व्यवसायात अनिल, लखन पाठोपाठ आता धिरजीची एंट्री झाल्याची चर्चा असुन दिवसेदिवस सुगंधीत तंबाखु व्यवसाय चांगलाच फोफावत चालला आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे. Mul taluka
मध्यप्रदेश राज्यातुन State of Madhya Pradesh मोठया प्रमाणावर चंद्रपूर जिल्हयात सुगंधीत तंबाकुची आडमार्गाने आयात केली जात आहेे, चंद्रपूर येथील वसीम आणि जयसुख यांच्या मध्यस्थीने मूल येथील अनिल, लखन यांना सुगंधीत तंबाखु पुरवठा केला जात होता, त्यांनी मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर गावोगावी फिरून अवैध सुगंधीत तंबाखु विक्री करीत आहे, आता याच व्यवसायात धिरज नामक युवक अवैध सुगंधीत तंबाकु विक्री करीत असल्याची चर्चा आहे, शासनाने प्रतिबंध केलेल्या या सुगंधीत तबाकुची मूल तालुक्यातुन सर्रास विक्री करीत असतानाही प्रशासन गप्प का असा सवाल आता नागरीक उपस्थित करीत आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी Collector Vinay Gowda G.C यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या सुरक्षित अन्न आणि निरोगी आहारासाठी सल्लागार समितीची आढावा सभा घेवुन अवैध साठा शौधुन तंबाखु व गुटखा विक्री करणाÚयांवर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाÚयांनी दिले होते. मात्र अजुनही मूल तालुक्यात सुगंधीत तंबाखु विक्री सर्रास सुरू आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष घालुन तालुक्यात सुरू असलेली अवैध सुगंधीत तंबाखु विक्रीवर पायबंध घालावा अशी अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केली आहे.