आपण दिलेल्या प्रेमाचे कर्ज व्याजासह परत करेन : नामदार मुनगंटीवार I will repay the loan of love with interest : Namdar Mungantiwar

Civil felicitation of Namdar Mungantiwar
Civil felicitation of Namdar Mungantiwar

नागरी सत्काराप्रसंगी नामदार मुनगंटीवारांचे उद्गार

मूल (प्रतिनिधी) : अर्थमंत्री असताना राज्याच्या विकासकामांसाठी जे कर्ज मी घेतले होते ते व्याजासह परत केलेले आहे, आपण जो प्रेम माझेवर दाखविलेला आहे त्याप्रेमाचेही कर्ज मी व्याजासह परत करेन असे उद्गार राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधिर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले, ते मूल येथील सुधिरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराच्या वतिने आयोजीत सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते. I will repay the loan of love with interest : Namdar Mungantiwar

Civil felicitation of Namdar Mungantiwar1
Civil felicitation of Namdar Mungantiwar1

शुक्रवारी दुपारी 3 वाजता मूल येथील सुभाष प्राथमिक शाळेच्या पटांगणावर आयोजीत केलेल्या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे, महामंत्री नामदेव डाहुले, भाजपा महिला प्रदेशच्या महामंत्री अल्का आत्राम, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष आणि सुधिरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचे संयोजक अविनाश जगताप, मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल चुधरी, गजानन वल्केवार, सामाजिक कार्यकर्ते लोकनाथ नर्मलवार, भाजपाचे शहर सरचिटणीस चंद्रकांत आष्टणकर, भाजपा ओबीसी सेलचे नेते प्रशांत बोबाटे, अजय गोगुलवार आदी मान्यवर उपस्थित होते. Devrao Bhongde, Namdev Dahule, Alka Atram, Ashish Devtale, Avinash Jagtap, Amol Choudhary, Gajanan Valkewar, Loknath Narmalwar, Chandrakant Ashtankar, Prashant Bobate, Ajay Gogulwar

माझा सत्काराचा कार्यक्रम फेल व्हावा यासाठी अनेकांनी प्रयत्न चालविला होता, परंतु चांगले काम करणाÚयाच्या मागे भगवान सुध्दा राहतो, यामुळे मूलचा हा नागरी सत्कार चांगल्या वातावरणात, उत्तम घडवुन आणला आहे, याबद्दल आयोजकांचे नामदार मुनगंटीवार यांनी आभार मानुन आपणाकडुन नागरीकांचे कामे पुर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Civil felicitation of Namdar Mungantiwar2
Civil felicitation of Namdar Mungantiwar2

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध संस्था, संघटनेच्या वतिने नामदार सुधिर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप यांनी केले संचालन मुनिराज कुटे यांनी तर उपस्थितांचे आभार अमोल चुधरी यांनी मानले. कार्यक्रमाला हजारो नागरीकांची उपस्थिती होती.

पालकमंत्री मूल शहरात, तालुकाध्यक्षांची कार्यक्रमाला दांडी
जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार सुधिर मुनगंटीवार हे नागरी सत्कार समारंभासाठी मूल शहरात आले होते, जवळपास आठ दिवसापासुन मूलच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती, आयोजकांनी पत्रकार परिषद घेवुन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सुध्दा केले होते, तरी भाजपाच्या मूल तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष कार्यक्रमाला अनुपस्थित राहील्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळया चर्चेला उत आलेला आहे.