ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेटाला, ब्रम्हपुरी राष्ट्रीय सेवा योजना आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. Maharashtra Institute of Pharmacy Betala, Bramhapuri
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य दुधे, प्रा. महाजन, प्रा. बारसागडे, प्रा. मेश्राम, प्रा.डोईजड उपस्थित होते.
ध्यान व योगासनाचे कोणते सकारात्मक परिणाम मन आणि शरीरावर होऊ शकतात यावर प्रा. महाजन यांनी प्रकाश टाकला. International Yoga Day
कार्यक्रमाचे संचालन प्रा. महाजन यांनी केले. तर उपस्थ्तिांचे आभार संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र पिसे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.