महाबिज महामंडळकडे तक्रार आणि पोलीस स्टेशनला माहिती सादर Complaint to Mahabij Corporation
मूल (प्रतिनिधी) : खरीप हंगामात जवळपास 5 एकर क्षेत्रात धान पिकाचे उत्पन्न घेवुन येथील महाबिज केंद्रामध्ये विक्री करण्यासाठी रितसर नोंदणी करून तपासणी फि सुध्दा भरलेले आहे, परंतु मूल येथील महाबिजच्या अधिकाऱ्यांनी सदर धानाचा रिपोर्ट 5 महिण्यानंतर फेल असल्याचे सांगुन शेतकऱ्यांना धान परत नेण्याच्या सुचना केल्या आहे. केवळ मूल येथील महाबिजच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा फटका शेतकरी खेमचंद देवाजी बोरकर या शेतकऱ्याला बसला असुन न्याय न मिळाल्यास मूल येथील महाबिज केंद्रासमोर आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असा इशारा महाबिज महामंडळाकडे केलेल्या तक्रारी म्हटले असुन मूल पोलीस स्टेशनला सदर निवेदनाची प्रत माहितीसाठी दिले आहे. Khemchand Devaji Borkar
मूल येथील शेतकरी खेमचंद देवाजी बोरकर यांची शेती मूल साजा येथे 3 हेक्टर असुन त्यांपैकी 5 एकर शेतात सुवर्णा वाणाच्या धानाचे उत्पन्न घेण्यासाठी महाबिज केंद्रासोबत त्यांनी करारनामा केला होता, त्यानुसार 10 जानेवारी 23 रोजी त्यांनी मूल येथील महाबिज केंद्रात 105 क्विंटल धान आणुन रितसर नोंदणी केली आणि धानाची तपासणी करण्यासाठी फि भरलेली आहे. तपासणीचा अहवाल येण्याआधीच मूल येथील एका अधिकाऱ्यांनी शेतकरी बोरकर यांना न सांगताच दुसऱ्यांच शेतकऱ्यांच्या मध्यस्थीने बोरकर यांना सांगण्यात आले. याबाबत त्यांनी मूल येथील महाबिज केंद्रात जावुन चौकशी केली असता धान तपासणीचा अहवाल सुध्दा कार्यालयात प्राप्त झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगीतले, मात्र अहवाल बोलावुन आपणास दिला जाईल असे उत्तरही त्यांना दिले,
महाबिज कडुन केलेल्या करारनाम्यानुसार माझे शेतावर महाबिजचे अधिकारी कधीही येवुन बघितले नसल्याचा आरोप बोरकर यांनी केला आहे. आधारभुत केंद्रात धान विक्री करण्यासाठी नोंदणी केली होती, त्यानुसार धानाला 2040 रूपये दर निश्चित झाला होता, मात्र महाबिज केंद्रात धानाची नोंदणी केल्यामुळे आधारभुत केंद्रात धान्य विकता आले नाही, यामुळे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले असुन कुटुंब उघडयावर पडलेले आहे. महाबिज केंद्राकडुन न्याय न मिळाल्यास महाबिज केंद्रासमोर आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा खेमचंद बोरकर या शेतकऱ्यांने दिला आहे.
प्राप्त तक्रार वरिष्ठांकडे पाठवु : अजय फुलझेले
गेल्या 25 वर्षापासुन खेमचंद बोरकर हे धानाचे वाण महाबिज केंद्रात विक्रीसाठी आणत आहे, त्यांनी घेतलेले धानाचे उत्पन्न कधीही फेल झालेले नाही मात्र यावर्षी बोरकर यांनी घेतलेले धानाच्या वाणाचे रिपोर्ट फेल आलेले आहे, याबाबत त्यांनी तक्रार केलेली असुन सदर तक्रार वरिष्ठांकडे पाठवु अशी प्रतिक्रिया जिल्हा महाबिज व्यवस्थापक अजय फुलझेले यांनी दिली