तालुक्यातीला चांदापूर येथील घटना
मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चांदापूर हेटी chandapur येथे विज पडून एकाचा मृत्यु तर चार जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी २ वा. चे दरम्यान घडली.One died due to lightning
घराकडे परत जात असताना अचानक नैसर्गिक वातावरण खराब झाल्याने प्रमोद लोमाजी लाटेलवार, संजय मारोती नरूले, विनोद सदोबा पाल, वसंत प्रकाश तिवाडे, बाळु तुकाराम तीवाडे आणि येलप्पा श्रीगिरीवार हे गांवालगतच्या चिंचेच्या झाडाखाली उभे होते. दरम्यान विजांचा कडकडाटात सहा जणउभे असलेल्या चिंचेच्या झाडावार विज पडल्याने प्रमोद लाटेलवार (३२) याचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर उर्वरीत पाचही जण जाखमी झाले. घटनेची माहीती होताच ग्रामस्थांनी धावापळ करून जखमींना सहकार्य करून उपचारार्थ उप जिल्हा रूग्णालयात हलविले. मृतक प्रमोद लाटेलवार हा विवाहीत युवक गांवालगतच्याच एका बार मध्ये नोकर होता. काळाने अचानक डाव साधल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाला. घटनेची माहीती होताच प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार डाँ. रविंद्र होळी यांनी सहका-यांसह घटनास्थळी भेट दिली. मृतक प्रमोद लाटेलवाल याच्या कुटूंबास व जखमींना नियमानुसार आर्थिक मदत करणार असल्याचे सांगीतले.