उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याना निवेदन सादर
मूल (प्रतिनिधी) : मनुवादी वृत्तीचे लिखाण करणाÚया इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेबसाईटवर सावित्रीबाई फुलेची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरवण्याची सोय अशा पध्दतीने लिखाण करण्यात आलेे आहे. सदर लिखाण म्हणजे सावित्रीआईची बदनामी करण्याचा प्रकार असुन लिखाण केलेल्या इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेबसाईटवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने मूल येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदनातुन केली आहे. All India Mahatma Phule Samata Parishad demands action
भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अतिशय खालच्या पातळीवर लिखाण करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुलेची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरवण्याची सोय असे लिखाण इंडिक टेल्स वेबसाईटवर करण्यात आले आहे. सदर लिखाण हेे वेदनादायी आहे फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीआईची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय असून, अशा वृत्तीचा आम्ही निषेध करीत असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटलेे आहे. निवेदन देताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे पुर्व जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. रामभाऊ महाडोळे, सामाजिक कार्यकर्त्या शशिकलाबाई गावतुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक डॉ. पद्माकर लेनगुरे, सुशीचे सरपंच अनिल सोनुले, चिमढाचे उपसरपंच योगेश लेनगरे, प्रा. दलित जनबंधु, प्रकाश लेनगुरे, धनराज मोहुर्ले, ़ऋषीदेव नागोशे, सौ. सिमा लोनबले, सौ. शारदा शेंडे, सौ. संगिता ढोले यासह समता परिषदेचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. Statement to the Sub Divisional Police Officer