उपचारासाठी दिल्लीला रवाना करणार
चंद्रपूर (प्रतिनिधी) : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांची प्रकृती बिघडली असून, त्यांच्यावर दिल्ली येथे उपचार करण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना पोटाचा आजार आहे. त्यासाठी ते नियमित उपचार करीत होते. मात्र, सततची धावपळ आणि कामाच्या ताणतणावामुळे त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली आहे. त्यामुळे त्यांना एअर अॅम्बुलन्सच्या माध्यमातून दिल्ली येथे हलवण्यात येणार असून, वेदांत हॉस्पिटल येथे उपचार होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून राजकीय आणि सामाजिक घडामोडी घडत असतानाच कौटुंबिक दुःखद घटना घडली. त्यामुळे त्यांच्या मनावर आघात झाला आहे. परिणामी प्रकृती बिघडली आहे. APMC कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकानंतर झालेला वाद, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (CDCC) अध्यक्ष संतोषसंतोष सिंग रावत यांच्यावर झालेला गोळीबार, त्यानंतर पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांचे भाऊ प्रवीण काकडे (pravin kakade) यांना चौकशीसाठी पाठवलेली ED नोटीस आणि आता काल वडील नारायण धानोरकर यांचे निधन या सर्व घटनांमुळे ते अस्वस्थ आहेत. त्यांना एअर ऍम्ब्युलन्सने वेदांता हॉस्पिटल दिल्लीला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
तपासणी, उपचार आणि विश्रांती घेत आहे कार्यकर्त्यांनी घाबरू नये : बाळू धानोरकर, खासदार
काल शनिवार दिनांक २७ मे रोजी नागपूर येथील खासगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार केले. परतू आज पोटात दुखू लागल्याने तपासणीसाठी दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे जात आहे. माझी प्रकृती स्थिर असून, कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, किंवा भयभीत होऊ नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील काही दिवस तपासणी, उपचार आणि विश्रांती घेत आहे.