अवैध धंदयांना पाठबळ कुणाचे?
मूल (प्रतिनिधी) : जिल्हातील दारूबंदी उलटी तरीही मूल तालुक्यातील अवैध दारूविक्री अजुनही बंद होत नसल्याने पोलीस प्रशासनाप्रती तिव्र रोष व्यक्त केल्या जात आहे. Illegal sale of liquor
चंद्रपूर जिल्हयात श्रमिक एल्गारच्या आंदोलनामुळे फडणवीस सरकारने जिल्हात दारूबंदी करण्यात आली होती. अनेक वर्षे दारूबंदी असल्याने अवैध दारूविक्रीला काही प्रमाणात आळा बसला होता, मात्र महाविकास आघाडी सरकारने आडवी बाटली उभी करण्याचे धाडस केल्याने जिल्हयात सर्वत्र सरकारमान्य दारू दुकाने, वाईन शॉप, बियर शॉपी सुरू आहे. दारूबंदी उठल्यानंतर तरी मूल तालुक्यात अवैध दारूविक्री होणार नाही अशी अपेक्षा नागरीकांना होती, मात्र दारूबंदीच्या काळापेक्षाही आता मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर अवैध दारूविक्री सुरू आहे, याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमध्ये पोलीसाप्रती तिव्र रोष व्यक्त केल्या जात आहे. Official liquor shops, wine shop, beer shop are open
मूल तालुक्यातील बहुतांष गांवामध्ये युवकांच्या माध्यमातुन,आणि बाहेर राज्यातुन आलेल्या काही अण्णा लोकांकडुन अवैध दारूविक्री खुलेआम सुरू आहे. मात्र त्याकडे गावातील पोलीस पाटील लक्ष देत नसल्याने त्याअवैध दारूविक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे, मूल पोलीस अशा दारूविक्रेत्यावर का कारवाई करीत नाही असाही सवाल आता नागरीक करीत आहे.