पोलीस अधिक्षक डॉ. रविंद्रसिंग परदेशी यांची माहिती
मूल (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास एस आय टी आणि वेगवेगळे 10 पथक तयार करून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. रविंद्रसिंग परदेशी यांनी दिली. Santosh Rawat firing case
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते संतोष रावत हे मूल येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत कार्यकर्त्यांशी चर्चा करून रात्रौ 9.20 वाजता दरम्यान ते दुचाकीने निवासस्थानाकडे जाण्यासाठी निघाले असता चारचाकी वाहनातुन बुरखाधारी इसमाकडुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, दैव बलवत्तर म्हणुन त्यांना गोळी स्पर्श करून गेली मात्र सुदैवाने कोणतीही गंभीर घटना घडली नाही, सदर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या अटकेसाठी कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असुन मूल बंद आणि वेगवेगळे आंदोनले करण्याच्या तयारीला लागले आहे, दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. रविंद्रसिंग परदेशी यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन मूलचे उपविभागीय अधिकारी मलिकाअर्जुन इंगळे यांच्याकडे तपासाची सुत्रे दिली असुन त्यासाठी वेगवेगळे 10 पथक तयार करण्यात आले आहे, सोबतच एस आय टी पथकाच्या माध्यमातुन तपास सुरू करण्यात आले आहे. आरोपीचा लवकरच शोध लागेल असा विश्वासही जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. रविंद्रसिंग परदेशी यांनी यावेळी व्यक्त केले.