मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राकेश रत्नावार APMC Niwadnuk

APMC NIwadnuk
APMC NIwadnuk

उपसभापतीपदी राजेंद्र कन्नमवार : अखेर दे धक्काचे भाकित खरे ठरले

मूल (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राकेश रत्नावार तर राजेंद्र कन्नमवार यांची उपसभापती म्हणुन अविरोध निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी दे धक्का एक्सप्रेसने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले ते आज तंतोतत खरे ठरले. Rakesh Ratnawar was elected as Chairman of Agricultural Produce Market Committee and Rajendra Kannamwar as Deputy Chairman.

Election to the post of Director of Market Committee
Election to the post of Director of Market Committee

18 संचालक असलेल्या मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणुक 28 एप्रिल रोजी पार पडली. यानिवडणुकीत संतोष रावत गटाचे 17 संचालक निवडुण आले होते. आज (शुक्रवार) सभापती, उपसभापती निवडणुक बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राकेश रत्नावार यांची सभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली आहे तर उपसभापतीपदी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक राजेंद्र कन्नमवार यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणुक प्राधिकृत अधिकारी म्हणुन तुपट होते.