टि. सी. प्रकरण तापले : दोन सदस्यीय समिती गठीत committee

A two-member committee
A two-member committee

आज होणार प्रकरणाची चौकशी

मूल (प्रतिनिधी) : निकाल घोषीत होण्यापुर्वीच तालुक्यातील कांतापेठ जिल्हा परीषद शाळेतील मुलांची टि.सी. दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली असुन समितीच्या अहवाला नंतर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहीती गट शिक्षणाधिकारी वैभव खांडरे यांनी दिली आहे. A two-member committee

सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मूल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी वर्षा पिपरे आणि केंद्र प्रमुख दयाराम भाकरे यांना चौकशी समितीच्या सदस्य म्हणुन नियुक्त केले आहे. ते आज (मंगळवार) ला शाळेला भेट देणार आहेत, यावेळेस कांतापेठ शाळेतील एक शिक्षिका आणि ज्यांचेविरूध्द आरोप करण्यात आला ते मुख्याध्यापक दिपक कुमरे उपस्थित राहणार असुन समितीचे सदस्य तक्रारकर्त्या महिलांसोबतच गांवातील इतरही पालकांशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहेत.

चौकशी समितीच्या भेटी अंती सादर होणाऱ्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. चिरोली येथील महात्मा फुले विद्यालय आणि नव भारत कन्या विद्यालय मूल येथील शिक्षकांनी राबविलेल्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थी शोध मोहीमेत बुध्दपोर्णीमेच्या दिवशी दोन शिक्षकी कांतापेठ जिल्हा परीषद शाळेत टि.सी. वरून चांगलाच गोंधळ झाला होता हे विशेष.