उपोषण मागे घेण्याचे संस्थाचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब वासाडे यांचे आवाहन
मूल (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळ मूल या संस्थेत रिक्त पदावर शासन निर्णयानुसार कायदेशीर प्रक्रिया राबवून अनुकंपा तत्वावर घेण्याबाबत दिलेले असतानाही उपोषण करते हर्षकला मुनीम सिडाम व आकाश मुनिम सिडाम यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. कुपोषणकर्त्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी आज विधान परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट बाबासाहेब वासाडे, उपोषणकर्ते, त्यांचे समर्थक संघटनांची बैठक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यालयात झाली. Even after the discussion, the hunger strike of the Sidam family continued
यावेळी झालेल्या चर्चेत अॅड. बाबासाहेब वासाडे यांनी शासन निर्णय क्र. संकीर्ण – 2022/प्र क्रं. 116/21/टिएनटी-2 दिनांक 17/10/2022. नुसार अनुकंपा तत्वावरील संस्थेत समावून घेण्याचा प्रस्ताव मा शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. चंद्रपुर यांचे कई कार्यवाहिस अधिनस्त शाळेकडुण करण्यात आलेला आहे. तसं प्रस्ताव शिक्षण प्रसारक मंडळ अधिनस्त शाळा मध्ये शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचान्यांचे पद भरलेले आहे. व त्यांचे वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव मा शिक्षणाधिकारी, जि. प. चंद्रपुर यांचे कार्यालयात प्रलंबित आहे. सदर प्रस्ताव निकाली निघाल्या नंतर प्रलंबित असलेल्या उर्वरित रिक्त होणाऱ्या जागावर आपल्या पाल्यास संचनिर्धारण शैक्षणिक सत्र 2023 2024 नुसार रिक्त असणाऱ्या शिक्षकेत्तर पदावर संस्थेतील अनुकंपतत्वावर प्राधान्य देण्याचा निर्णय झाला. यावेळी उपोषणकर्ते, त्यांचे सोबतचे संघटनेचे पदाधिकारी यांनी हा निर्णय मान्य केल्याने तसे लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तयार असल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन अॅड. वासाडे यांनी केले आहे.