अन्यथा गावकरी करणार आंदोलन
मूल (प्रतिनिधी) : सुरजागड येथील लोहखनिजाची वाहतुक करण्यासाठी केळझर रेल्वे स्टेशन परिसरात मालधक्का सुरू करण्यात आलेला आहे, यामालधक्कामुळे केळझरच्या नागरीकांचे आरोग्य आणि इतरही समस्या निर्माण झाले असुन सदर मालधक्का चिचपल्ली रेल्वे स्टेशन परिसरात हटवावा अन्यथा केळझरच्या नागरीकांसोबत आंदोलन करून Otherwise the villagers will protest असा इशारा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे आणि केळझरच्या नागरीकांनी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. Move Maldhakka Elsewhere : Dr. Abhilasha Gavture
गडचिरोली जिल्हयातील सुरजागड येथील लोहखनिज वाहतुक करण्यासाठी मूल रेल्वे स्टेशन परिसरात प्रस्तावित मालधक्काचे कामाला सुरूवात होणार होती, मात्र मालधक्का सुरू झाल्यास होणारा परिणाम लक्षात घेवुन नागरीकांनी जनआंदोलन केल्याने मूल येथे मालधक्काचे काम थांबविण्यात आले होते, मात्र हाच मालधक्का मूल तालुक्यातील केळझर येथील नागरीकांना माहिती न करताच केळझर येथील रेल्वे स्टेशन परिसरात सुरू करण्यात आलेला आहे. यामालधक्कामुळे केळझरच्या नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, घराचे छप्परावर लाल मातीचे कण जमा होत आहे. विहीरीच्या पाण्यावर लाल कण जमा होत असल्याने नागरीकांना विविध समस्येचा सामना करावा लागत आहे. यासोबतच शाळेच्या समोरून लोहखनिजाचे वाहतुक होत असल्याने विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता लागली असुन यामालधक्कामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, आरोग्याची समस्याही लोहखनिजामुळे होत आहे. यामुळे सदर मालधक्का केळझर पासुन दुर हटवुन ज्या रेल्वे स्टेशन परिसरात नागरीकांची वस्ती नाही अशा चिचपल्ली रेल्वे स्टेशनवर हटवावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मूलचे तहसीलदार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे.
मालधक्का सुरू झाल्याने अनेक शेतकÚयांच्या शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे यामुळे शेतीचे पंचनामे करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. प्रविण गावतुरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शेषन्नाजी बोलदवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राकेश गावतुरे, सुनिल भडके, आदर्श रायपुरे यांच्यासह केळझरचे नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.