चोरी गेलेले बैल मिळाले : शेतकऱ्याची समयसुचकता आली कामी Bull thieves have become active

Bull thieves have become active
Bull thieves have become active

तालुक्यात बैलचोर झाले सक्रीय, पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल 

मूल (प्रतिनिधी) : घरी असलेल्या बैलाकडे लक्ष ठेवण्यासाठी सांगुन कौटुंबिक कार्यक्रमाला गेलेल्या माणिक पुंडलीक बोरकर यांच्या मालकीचे 3 बैल चोरटयांनी मूल Mul येथुन चोरून परस्पर विक्री करीत असताना, बैलांचा शोधाशोध करीत असताना गडचांदुर येथील बैल बाजारात Bull market at Gadchandur बैलांची विक्री करीत असताना 2 मे रोजी युनुस खान तमीज खान हे आढळुन आले. सदर बैल चोरटयांवर मूल पोलीस स्टेशन Mul Police Station येथे गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणात युनुस खान तमीज खान वय 30 वर्षे रा. अष्टभुजा वार्ड चंद्रपूर आणि सुमित मनोज शेंडे रा. विहीरगांव मूल यांच्यावर मूल पोलीस स्टेशन येथे भांदवी 379, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. Yunus Khan Tameez Khan age 30 years Res. Ashtabhuja Ward Chandrapur and Sumit Manoj Shende Res. A case has been registered against the Vihirgaon Mul under Bhandvi 379, 34.

मूल तालुक्यातुन मोठया प्रमाणावर जनावरांची तस्करी केली जात आहे, काही दिवसांपुर्वीच मूल पोलीसांनी सुमारे 50 जनावरांची तस्करांच्या तावडीतुन सुटका करीत गोसंरक्षण संस्थेमध्ये पाठविण्यात आले आहे. मात्र अजुनही गोतस्करी सुरूच आहे, याकामात मूल शहरातील काही तरूण युवक त्यांचे ‘‘दलाल’’ म्हणुन काम करीत असल्याने गोतस्करी करणारे सहज जनावरांची वाहतुक करीत आहे. दरम्यान मूल येथील माणिक पुंडलीक बोरकर वय 60 वर्षे हया शेतकऱ्याच्या मालकीचे 3 बैलांकडे लहान मुलगा गणेश याला लक्ष ठेवण्याचे सांगुन एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गडचिरोली जिल्हयातील आष्टी येथे 29 एप्रिल रोजी गेले होते. कार्यक्रम आटोपुन रात्रौ परत आल्यानंतर तिन्ही बैल घरी नसल्याने मुलाला विचारून बैलाची शोधाशोध केली, परिसरातील कोंडवाडे, लोहारा आणि तोहगांव येथील गोसंरक्षण संस्थेतील जनावरे बघुन आले मात्र तिन्ही बैल मिळुन आले नाही, शेवटी बोरकर यांनी मंगळवारी गडचांदुर येथील बैल बाजारात बैल मिळेल याआशेने गेले असता त्याठिकाणी युनुस खान तमीज खा वय 30 वर्षे हे बोरकर यांचे तिन्ही बैल विक्रीसाठी आणल्याचे दिसुन आले, यामुळे बोरकर यांनी याबाबत अधिक चौकशी करून बैल माझे मालकीचे असल्याचे सांगताच युनुस खान तमीज खा याने सदर बैल मूल येथे आणुन दिले आणि सदर बैल सुमित मनोज शेंडे रा. विहीरगांव मूल यांचे कडुन मूल येथुन खरेदी केल्याचे त्यांनी सांगीतले.

स्वतःची असलेली शेती आणि मजुरी करून कुटुंबाचा गाळा पेलणाऱ्या माणिक बोरकर यांनी मूल पोलीस स्टेशनला बैल चोरीची फिर्याद दाखल केली, तक्रारीवरून मूल पोलीस स्टेशन येथे युनुस खान तमीज खान वय 30 वर्षे रा. अष्टभुजा वार्ड चंद्रपूर आणि सुमित मनोज शेंडे रा. विहीरगांव मूल यांच्यावर भांदवी 379, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मलिकाअर्जुन इंगळे, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.