मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण
मूल (प्रतिनिधी) : आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडुन मूल येथील एल्गार कार्यालयाच्या बाजुला हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्राचा Apla dawakhana kendra लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी 10 वाजता मुख्ममंत्री नामदार एकनाथ शिंदे Chief Minister Namdar Eknath Shinde यांच्या हस्ते ऑनलाईन डिजीटल प्रणालीव्दारे करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे ’हिंन्दुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ केंद्र स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होतेे. त्या निर्देशाचा अनुषंगाने आरोग्य विभाग जिल्हा परिषद, चंद्रपुर व तालुका आरोग्य अधिकारी म ुल यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मूलच्या वतिने ताडाळा मार्गावर एल्गार कार्यालयाच्या बाजुला हिंदुुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे तालुकास्तरीय लोकार्पण 01 मे. रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंन्दे यांचे हस्ते ऑनलाईन डिजीटल प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात येणार आहे.
जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाÚया नागरीकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्या या उद्देशाने पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. रोगनिदान व उपचार, गरोदर माता व बालक तपासणी, बालकांचे लसिकरण, संशयित क्षयरोग व कुष्ठरोग तपासणी, रक्त नमुणे घेणे इत्यादी सेवा सदर दवाखान्यातुन पुरविण्यात येणार आहे नागरीकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन मूल नगर पालीकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर Ajay Pathankar, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समिर थेरे Dr. Samir There, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. देवेंद्र लाडे Dr. Devendra Lade यांनी केले आहे.