तिघांवर गुन्हा दाखल
मूल (प्रतिनिधी) : निवडणुकीत खर्च झालेले 10 हजार रूपये परत दे म्हणुन केळझरच्या माजी महिला सरपंचाकडे रात्रौ 9.30 वाजता दरम्यान घरी जावुन अश्लील शिवीगाळ करणाÚया तिघांवर मूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. आशिष पैकुजी बर्रेवार Ashish Barewar वय 34 वर्षे, पंकज प्रकाश चल्लावार Pankaj Challawar वय 34 वर्षे आणि प्रविण चक्रधर मानकर Pravin Mankar वय 33 वर्षे रा. सर्व केळझर Kelzar असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांचे नांव आहे. A case has been registered against three
मूल तालुक्यातील मौजा केळझर ग्राम पंचायत सदस्यांची पंचवार्षिक निवडणुक 2020 मध्ये पार पडली, याठिकाणी महिलाकडे सरपंच पद देण्यात आले होते, ग्राम पंचायतचा कार्यभार सुरळीत सुरू असतानाही काही सदस्यांनी सदर महिला सरपंचावर 2 महिण्यापुर्वी अविश्वास आणला, दरम्यान 26 एप्रिल रोजी रात्रौ 9.30 वाजता दरम्यान केळझर येथील आशिष पैकुजी बर्रेवार या 34 वर्षे, पंकज प्रकाश चल्लावार वय 34 वर्षे आणि प्रविण चक्रधर मानकर वय 33 वर्षे यांनी दारूच्या नशेत माजी महिला सरपंचाच्या घरी जावुन तुला आम्ही ग्राम पंचायतच्या निवडणुकीत निवडुण आणण्यासाठी 10 हजार रूपये खर्च केले आहेत, ते तु दे म्हणुन अश्लिल शिवीगाळ केले.
याबाबतची तक्रार माजी महिला सरपंचानी मूल पोलीस स्टेशनला दिली. तक्रारीच्या आधारे आशिष पैकुजी बर्रेवार या 34 वर्षे, पंकज प्रकाश चल्लावार वय 34 वर्षे आणि प्रविण चक्रधर मानकर वय 33 वर्षे यांच्यावर कलम 354 (अ), 509, 447, 504, 506 34 सहकलम अनुसुचित जाती, जमाती प्रतिबंधक कायदयांवन्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मलिकाअर्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.