अर्ज करूनही वेगवेगळे चिन्ह मिळाल्याने उमेदवारामध्ये नाराजी : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक
मूल (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणुक कार्यक्रमानुसार 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता निवडणुक लढविणाऱ्या उमेदवाराची अंतिम यांदी प्रसिध्द करणे व चिन्ह वाटप करायचा तपशीलात नमुद केलेला आहे, यानुसार शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना एकच चिन्ह वाटप करण्याबाबत पत्र दिले मात्र निवडणुक निर्णय अधिकाऱ्यानी वेगवेगळे चिन्ह दिल्याने शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांनी अपिलीय अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक यांचेकडे लेखी आक्षेप दाखल केला आहे. Shetkari Vikas Aghadi’s objection over distribution of symbols
मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक येत्या 28 एप्रिल रोजी होवु घातलेली आहे. यानिवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदार संघाच्या सर्वसाधारण गटातुन 10, महिला राखीव गटातुन 3, इतर मागासवर्गीय गटातुन 2 आणि विमुक्त जाती/भटक्या जमाती गटातुन 2 उमेदवार निवडणुक रिंगणात उभे आहेत, अडत्ये व व्यापारी मतदार संघातुन 4 उमेदवार उभे आहेत तर ग्राम पंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटातुन 4, अनुसुिचत जाती/जमाती गटातुन 3, आर्थीककदृष्टया दुर्बल घटक गटातुन 2 उमेदवार निवडणुक लढणार आहेत. यासर्व उमेदवारांना आज (21 एप्रिल) रोजी चिन्ह वाटप करण्यात आले आहे.