गोवंशीय जनावराचांची अवैध वाहतुक करणाऱ्यावर कारवाई Action against illegal traffickers of bovine animals

50 Action against illegal traffickers of bovine animals
50 Action against illegal traffickers of bovine animals

एक जण ताब्यात तीन आरोपी फरार: १६ लाख 8० हजाराचा मुद्देमाल केला हस्तगत

मूल (प्रतिनिधी) : वरिष्ठांच्या आदेशानुसार आँल आऊट आँपरेशन मोहीम राबवित असताना ठाणेदार सुमीत परतेकी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे येथील गांधी चौक येथे नाकेबंदी करून वाहणांची तपासणी केली असता मध्यरात्री 3 वाजता नंतर आंध्रप्रदेश पासींगच्या दोन ट्रक मधून तब्बल 50 पाळीव जनावरांची अवैद्यरित्या वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आले. 50 Action against illegal traffickers of bovine animals

मागील काही वर्षापासून तालुक्यातील टेकाडी परिसरातून मोठया प्रमाणांत पाळीव जनावरांची अवैद्यरित्या वाहतुक होते. याची परिसरातील नागरीकांना इत्यंभुत माहिती आहे. दरम्यानच्या काळात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी कारवाई सुरू केल्यानंतर जनावरांची अवैद्य वाहतुक करणा-या व्यवसायीकांनी जनावर गोळा करून वाहतुकी करीता वाहण भरण्याची जागा बदलवली. दरम्यान स्थळ बदलाची माहिती जनतेसह ठाणेदार सुमीत परतेकी यांना मिळाली होती. म्हणून मागील काही महिण्यांपासून ठाणेदार सुमीत परतेकी अवैद्य जनावर वाहतुकीवर लक्ष ठेवून होते. दरम्यान काल रात्रो आंध्रप्रदेश पासींगच्या दोन ट्रक मधून मोठया प्रमाणांत पाळीव जनावरांची वाहतुक होणार असल्याची माहिती ठाणेदार सुमीत परतेकी यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे काल रात्रो ठाणेदार सुमीत परतेकी सहकारी अधिकारी आणि कर्मचारीवृंदासह स्थानिक गांधी चौकात नाकेबंदी करीत असतांना ट्रक क्रमांक एपी-29-टिबी-3519 आणि ट्रक क्रमांक एपी-20-वाय-9455 ची तपासणी केली, तेव्हा 3519 क्रमांकाच्या ट्रकच्या डाल्यामध्यें 24 बैल आणि 9455 क्रमांकाच्या ट्रक मध्यें 26 बैल असा एकुण 6 लाख 80 हजार रूपये किंम्मतीच्या पाळीव जनावरांना निर्दयतेने भरून अवैद्यरित्या वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही ट्रकची तपासणी करीत असतांना एका ट्रकच्या चालकाने अंधाराची संधी साधून पोबारा केला. त्यामूळे गडचांदूर येथील प्रशांत बाळा जुमनाके (28) हा ट्रक चालक पोलीसांच्या गळात अडकला. ट्रक चालक प्रशांत जुमनाके यांना ताब्यात घेवून त्यांचे कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी तालुक्यातील टेकाडी येथील रहीवाशी मोहम्मद अली अजगर अली सैयद आणि त्यांचा मुलगा किस्मत अली मोहमद अली सैयद यांचे विरूध्द पोलीस स्टेशन मूल येथे महाराष्ट्र प्राणी सुधारीत अधिनियम 1976 सहकलम, प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी 50 पाळीव जनावरांसह दोन ट्रक असा एकुण 16 लाख 80 हजार रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असून सध्या आरोपी ट्रकचालक प्रशांत जुमनाके पोलीसांच्या ताब्यात आहे. एका ट्रक चालकासह टेकाडी येथील सैय्यद पितापुञ पसार झाले आहेत.

सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सुमीत परतेकी यांनी केली. सदर मोहीम काळात सहायक पोलीस निरीक्षक सतिश बनसोड, सहायक फौजदार उत्तम कुमरे, पोहवा पुंडलीक परचाके, सचिन सायंकार, सुनिल घोडमारे, गजानन तुरेकर, स्वप्नली यांचे सहकार्याने केली. फरार आरोपीच्या शोधासह पुढील तपास सपोनि सतिश बनसोड करीत आहेत.