चिरोली (प्रतिनिधी) : क्रांतीबा बहुउद्देशिय युवा विचार मंच आणि क्रांतीबा सार्वजनिक वाचनालय चिरोली यांच्या सयुक्त विद्यमाने रिझर्व बँक स्थापना दिनाचे औचित्य साधून चिरोली येथे येणाऱ्या प्रवाश्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या सामाजिक बांधिलकीतून पाणपोईचे उद्घाटन मूल पंचायत समितीच्या माजी सदस्या वर्षाताई लोनबले Varshatai Lonbale यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रशांत रामटेके, सामाजिक कार्यकर्ते राजु वाढई उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाखा पुण्यप्रेडीवार, पुजा निकूरे, सारिका गदेकार, चंदा मंडरे, सुभाष निकुरे, अनिल गदेकार, संतोष अलोणे यांनी सहकार्य केले. यावेळी मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.