कुत्रे आडवे गेल्याने झाला अपघात
चिमूर (प्रतिनिधी): तालुक्यातील कवठाळा तिरखुरा मार्गावरून आज रविवारला दुपारी दुचाकीने २:०० च्या दरम्यान जात असतांना अचानक समोरून कुत्रे आडवे आले. ज्यामुळे दुचाकी चालकाने ब्रेक मारले ज्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकी खाली फेकल्या गेली. ज्यात चालक धनराज सोमाजी ढोणे वय ५० वर्ष रा.सोनेगाव बेगडे याचा जागेवरच मृत्यु झाला. तर मागे बसलेला गोपाळ पांडूरंग ढोणे जखमी झाला. One died on the spot, one injured in a two-wheeler accident
नगर परीषद चिमूर क्षेत्रातील सोनेगाव ( बेगडे ) येथील धनराज सोमाजी ढोणे वय ५० वर्ष हा स्वतःच्या दुचाकीने गावातीलच गोपाळ पांडूरंग ढोणे वय ५५ वर्ष याला घेऊन नातलगांच्या कार्यक्रमाला गदगाव भिसी राज्य मार्गाने दुपारच्या वेळेला निघाला होता. कवठाडा-तिरखुरा च्या महामार्गांवर मधातच अचानक कुत्रे आडवे आले.ज्यामुळे धनराज याने जोरदार ब्रेक लावले ज्याने दुचाकी अनियंत्रीत झाली.मागे बसलेला गोपाळ खाली पडला तर धनराज दुचाकीसह उसळुन रस्त्याच्या बाजुला १५ फुट खाली पाटात पडला.ज्यामुळे डोक्याला जबर मार लागुन जागेवरच धनराज ढोणे याचा मृत्यु झाला.हा अपघात त्यांच्याच गावातील मागाहून येणाऱ्या नातलगांना दिसला.त्यांनी अपघाताची माहीती चिमूर पोलीस स्टेशनला दिली व जखमी गोपाळ ढोणेला उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहीती होताच पोलिस उपनिरीक्षक सुशिलकुमार सोनवाने पोलिस कर्मचारी राहुल चांदेकर यांचेसह घटनास्थळावर पोहचुन घटनेचा पंचणामा केला.प्रेत उत्तरीय तपासणी करीता उप जिल्हा रुग्णांलयात पाठविण्यात आले.जखमी गोपाळ ढोणे वर उपचार सुरु आहे.पुढील तपास चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक मनोज गभने यांचे मार्गदर्शनात सुरु आहे. धनराज ने जर हेल्मेट लावले असते तर मृत्यु झाला नसता अशी चर्चा सुरु आहे.मृतकाच्या मागे एक मुलगा,एक मुलगी,पत्नी तथा मोठा आप्त परीवार आहे.धनराजच्या अचानक मृत्युने सोनेगाव बेगडे येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.