मूल (प्रतिधिनी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 14, 17 आणि 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा 14 ते 16 फेब्रुवारी 2023. जिल्हा क्रीडा संकुल, बारामती (पुणे) baramati pune येथे आयोजित करण्यात आली होती. Divya Narad won silver medal in state level school karate sports competition
सदर स्पर्धेत राज्यातील कोकण, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, लातूर आणि पुणे या आठ विभागातील खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेत नागपूर विभागाकडून 17 वर्षांखालील मुलींमध्ये जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया आणि तालुका कराटे-डो असोसिएशन मूल यांच्याशी संलग्न असलेल्या कराटे अँड फिटनेस क्लब मूल ची कु. दिव्या किशोर नरड (सेंट अँन्स हायस्कूल, मूल) हिने – 44 किलो. या वजन गटात आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करत रौप्यपदक पटकावले आहे.स्पर्धेस्थळी खेळाडूच्या कोच ची भूमीका साहिल खान आणि अमान खान यांनी योग्यरीत्या बजावली.
दिव्याला जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख आणि क्लबचे मार्गदर्शक सेन्सेई विनय बोढे, कराटे अँड फिटनेस क्लब मूलचे संचालक-प्रशिक्षक इम्रान खान आणि निलेश गेडाम, पालक व शहरवासी यांनी अभिनंदन केले आहे.