मूल (प्रतिनिधी) : क्षेत्राचे आमदार, जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन मूल तालुक्यातील येरगांव येथील युवकांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे, पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व युवकांना पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.
मुल तालुक्यातील अतिशय संवेदनशील म्हणुन परिचीत असलेल्या येरगांव येथील प्रवीण पेंदोर, गणेश तोडासे, जालिंदर पेंदोर, दिलीप कोडापे, कृष्णा मडावी, संतोष कोडापे, मयूर मडावी, गंगाधर जुमनाके या युवकांनी मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, येरगांव येथील भाजपाचे युवा नेते राजु नागापूरे, महादेव नागापूरे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केले. सदर युवकांनी नामदार मुनगंटीवार यांच्या विकासकामांवर प्रभावीत होवुन पक्ष प्रवेश केल्याची प्रतिक्रिया युवकांनी दिली.
येरगांवच्या युवकांनी भाजपामध्ये प्रवेश घेवुन येरगांवची भाजपा भक्कम केलेली आहे, यापुढे येरगांवच्या विकासासाठी काहीही कमतरता पडु देणार नसल्याचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केले.