कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द#Nivadnuk

प्रारूप मतदार यादीवर आक्षेप घेण्याची शेवटची तारीख  23 नोव्हेंबर पर्यंत

मूल (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणुक सन 2022-23 ते 2027-28 या कालावधीकरीता प्रारूप मतदार यादी व कार्यक्रम प्रसिध्द करण्यात आलेला आहे. यानुसार बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असुन मतदार यादीवर 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा निवडणुक अधिकारी (कृउबास) यांचेकडे लेखी आक्षेप घेता येणार आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणुक होणार असुन त्यादृष्टीने प्रारूप मतदार यादीत प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदार असलेल्या कोणत्याही सभासदास मतदार यादीतील नाव, पत्ता, लिंग व संस्थेचा तपशिल या संबधीत कोणतीही अकृती किंवा चुक संबधी लेखी हरकती किंवा आक्षेप सकारण पुराव्यासह जिल्हा निवडणुक अधिकारी (कृउबास) यांचेकडे 23 नोव्हेंबर पर्यंत कार्यालयीन वेळात दाखल करता येणार आहे. निश्चित केलेल्या तारखेनंतर आलेला दावा किंवा आक्षेप विचारात घेतला जाणार नसल्याचे जिल्हा निवडणुक अधिकारी (कृउबास) यांनी प्रसिध्द केलेल्या कार्यक्रमात नमुद केले आहे.

जिल्हा निवडणुक अधिकारी (कृउबास) यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिध्दीचा कार्यक्रम जाहिर केला असुन त्यानुसार 14 नोव्हेंबर रोजी जिल्हा निवडणुक अधिकारी (कृउबास) यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे, दिनांक 14 ते 23 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यत प्रारूप मतदार यादीवर लेखी आक्षेप हरकती मागणे, दिनांक 23 ते 2 नोव्हेंबर पर्यंत प्राप्त आक्षेप/हरकतीवर निर्णय घेणे, अािण 7 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्हयातील कोरपना, राजुरा, गोंडपिपरी, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभिड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मूल, आणि पोंभुर्णा येथील सहकारी संस्था, ग्राम पंचायत, व्यापारी व अडते, आणि हमाल व तोलारी मतदार संघातील मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.