मूल तालुक्यातील कवळपेठ येथील घटना
मूल (प्रतिनिधी) : गुरे चराईसाठी नेलेल्या दोन गुराख्यांना दबा धरून बसलेल्या वाघाने ठार केल्याची घटना चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या चिचाळा बीटातील कक्ष क्रमांक 751 मध्ये सदर घटना बुधवारी (ता. 19) रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान घडली. ढिवरू वासेकर वय 55 वर्षे आणि नानाजी निकेसर वय 53 वर्षे रा. चिचाळा असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या गुराख्यांचे नांव आहे.
मूल तालुका हा धान पट्टा आहे, यापरिसरातील शेतकरी मोठया प्रमाणावर गुरांचे पालणपोषण करतात, दरम्यान रोजच्या प्रमाणे आज बुधवारी चिचाळा येथील ढिवरू वासेकर वय 55 वर्षे आणि नानाजी निकेसर वय 53 वर्षे हे स्वतःच्या मालकीचे गुरे घेवुन कवळपेठ परिसरात चराईसाठी नेले होते, दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. घटनेची माहीती गावकऱ्यांना होताच गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली, घटनास्थळाला चिचपल्लीच्या वनपरीक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे, मूलचे पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांनी भेट दिली, वनविभागाच्या वतीने मृतकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी 30 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली.
क्षेत्र सहाय्यक मोरेश्वर मस्के, महादवाडीचे क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके, जाणालाचे वनरक्षक राकेश गावतुरे, चिचाळाच्या वनरक्षक शितल व्याहाडकर, मूलचे वनरक्षक सुभाष मरस्कोल्हे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन शव उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.