मुंबई (प्रतिनिधी) : लम्पी चर्मरोगाच्या पादुर्भावाने पशुचा मृत्यु होवून हाणी झाल्यास अशा पशुधनाच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
नुकसान भरपाईसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन प्रत्येक जिल्हयातसाठी 1 कोठी रूपयाची तरतुद करण्याचे निर्देशही देण्यात आले. मंत्रिमंडळाच्या याच बैठकीत पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे बाहयस्त्रोताव्दारे भरण्याबाबत मान्यता देण्यात आली. राज्यातील पशुधनाला लम्पी चर्मरोगाचा वेगाने प्रादुर्भाव होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यावेळी ज्याशेतकरी किंवा पशुपालकाचे पशुधन याआजारामुळे मृत्यु पावले आहे, त्याना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकर्षानुसार राज्यशासनाच्या निधीतुन भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानिर्णयाच्या अमलबजावणीसाठी संबधीत जिल्हाच्या जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे.
लम्पी चर्मरोगाच्या नियत्रंणासाठी आवश्यक लस, साधनसामग्री, औषधी अशा विविध बाबीवरील खर्चासाठी जिल्हा नियोजन समित्यांनी सन 2022-23 मधील उपलब्ध निधीतुन 1 कोठी रूपयाचा निधी तातळीने करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.