नंदीबैल सजावट आणि वेशभुषा स्पर्धेचे आयोजन
मूल (प्रतिनिधी) : येथील सेंट अँन्स हायस्कुल येथे तान्हा पोळया निमीत्याने लहान विद्यार्थ्यांसाठी तान्हा पोळ्याचे आयोजन मोठया उत्साहात करण्यात आले. इयत्ता नर्सरी, के जी १ आणि के जी २ विद्यार्थ्यांसाठी नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन सेंट अँन्स हायस्कुलच्या मुख्याध्यापिका रेव्ह.सिस्टर शॅलेट सॅबस्टियन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा तसेच नंदी बैलांची आकर्षक सजावट केली होती. सदर स्पर्धेचे परीक्षण चित्रकला शिक्षक लालाजी बावणे व धनराज कुडे यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना यावेळी आकर्षक बक्षिस देण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीयतेसाठी ज्योती चटारे, सीमा बोकारे, कीरण चौधरी, नयना टीचर, स्वाती पोतनूरवार, मोहिनी गाजेवार, स्वाती भोपये, विद्यार्थी प्रतिनिधी स्वरूप लाडे व संचीरा चिकाटे यांनी अथक परिश्रम घेतले.