विजेच्या धक्काने युवा शेतकऱ्याचा मृत्यु

मूल (प्रतिनिधी) : शेतात काही कामानिमित्त गेलेल्या युवा शेतकऱ्याला विजेचा धक्का बसून तो जागीच ठार झाल्याची घटना कुरमार चांदली शेतशिवारात रात्रौ 10 वाजता दरम्यान घडली. प्रमोद वसंतराव चटारे वय 43 वर्ष रा. मूल असे युवा शेतकऱ्याचे नाव आहे.

मूल येथील माऊली असलेली इलेक्ट्रिक संचालक तथा युवा शेतकरी प्रमोद वसंतराव चटारे हे गुरुवारी रात्रौ जी शेती करत होता त्या शेतावर गेले होते. मूल येथील एका शेतकऱ्याची कुरमार चांदली येथे शेती असून सदर शेतात विज आहे. त्याठिकाणी असताना अचानक त्याला विजचे धक्का बसला. सोबत असलेल्या एका व्यक्तीने सदर घटना चांदली येथे येऊन काही नागरिकांना सांगितले. नागरिकांनी त्याला विज प्रवाहापासून दूर करीत विज वितरण कंपनी ला माहिती दिली.

उत्तरीय तपासणीसाठी रात्रौ सावली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा आप्तपरिवार आहे.