दोन तासांच्या अथक परिश्रमा नंतर लागला मृतदेहाचा शोध
वरोरा (प्रतिनिधी) : तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे नदी, नाले, धबधबा, धरणे ओसंडून वाहत आहे, या निसर्गरम्य वातावरणात फिरायला गेलेल्या मित्रानी सेल्फी काढत असताना तलावाजवळ पाय घसरल्याने दोन मित्रांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. हार्दिक विनायक गूळघाने वय 19 वर्षे रा. शेगाव, आयुष चीडे, वय 19 रा. वरोरा असे मृत्युमृखी पडलेल्यांची नावे आहेत
तालुक्यातील चारगांव बु. येथील तलाव जवळ फिरायला वेतम चंद्रकुमार जयस्वाल वय 19 रा. शेगाव, मयूर विजय पारखी वय 20 रा. वरोरा, आश्रय संजू गोळगोंडे वय 19 रा. वरोरा, हार्दिक गुळघाणे वय 19 वर्षे रा. शेगाव, आणि ,आयुष चिडे वय 19 रा. वरोरा हे गेले होते. दरम्यान हार्दिक गुळघाने हा तलाव जवळ फोटो काढायला गेला असता त्याचा पाय घसरून तो तलावात पडला. हार्दिकला वाचवायला आयुष चिडे गेला असता तो पण तलावात बुडाला. बाकी मित्रांनी आरडाओरड करून स्थानिक नागरिकांना बोलविले परंतु खूप उशीर झाल्याने हार्दिक आणि आयुष यांची शरीर खोल धरणाच्या पाण्याच्या आत गेली त्यामुळे स्थानिक लोकांच्या मदतीने बुढलेल्ल्या हार्दिक आणि आयुष यांचा शोध पोलीस कर्मचाÚयांनी घेतला.
दोन तासांच्या अथक परिश्रमा नंतर लागला मृतदेहाचा शोध
पावणे तीन वाजता घडलेल्या घटनेनंतर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाली ,पोलिसांनी कोळी बांधव व स्थानीक नागरिकांच्या मदतीने या बालकाचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली, दोन तासांच्या अथक परिश्रमा नंतर पोलिसांना कोळी बांधवांच्या मदतीने मृतदेह धरणाच्या बाहेर काढण्यात यश आले मृतदेहाला उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहे