सरपंचाची हुकुमशाही : सदस्यांचा विरोध
सुधाकर दुधे, सावली
दारू आणि बियर शॉपीला नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा विषय मोखाळा ग्राम पंचायतच्या सरपंचानी ग्रामसभेत ठेवल्यावरून सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्यांमध्ये झलेल्या वादावरून सरपंचानी थेट ग्राम पंचायत सदस्याचा अपमान केल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.
सावली तालुक्यातील मोखाळा ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच पार पडली, सदर ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली मात्र काही विषयांवर सरपंचांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, जिल्ह्यातील दारुबंदी उठल्यानंतर नदी काठच्या गावात दारुचे दुकान सुरू करण्यात मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्या चढाओढ दिसून येत आहे. दरम्यान सरपंचाला हाताशी धरून नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी अर्थपूर्ण चर्चा सुध्दा करण्यात येत आहे. दारु व बिअर शॉपीचा विषय सरपंचानी ग्रामसभेत नाहरकत प्रमाणपत्रासाठी ठेवले, सदर विषय मासिक सभेत न ठेवता, ग्राममसभेत कसे काय? असा प्रश्न काही सदस्यांनी सरपंचास विचारले असता सरपंचानी तुम्हाला विचारण्याची गरज नसल्याची सागुन उपस्थित नागरीकांसमोर सदस्यांशी अपमानस्पद बोलले.
मोखाळा ग्रामपंचायत अंतर्गत एक बिअर शापी, बिअर बार व एक देशी दारुचे दुकान सुरु करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिलेले आहे. याबाबत ग्रामपंचायतच्या मासिक सभेत कोणत्याही प्रकारचे विषय न ठेवता परस्पर नाहरकत प्रमाणपत्र दिले असून या विषयी ग्रामसभेत विषय मांडला असता, ग्रामस्थांनी तुम्ही मासिक सभेत विषय मांडला का ? असे विचारणी केली असता, सर्व सदस्यांनी आम्हाला या विषय काही माहीती नाही, त्यावरून सरपंचाची मनमानी कारभार करीत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
ग्रामपंचायत सदस्यांनी विविध कामावर आक्षेप घेतला असुन सरपंचाविरोधीत नऊ सदस्य आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात सदस्य आणि गावकरी कोणती भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाहरकत प्रमाणपत्राबाबत ग्रामसभेत विषय ठेवण्यात आला होता मात्र ग्रामस्थांनी पुढील विशेष ग्रामसभेत सदर विषय ठेवावे असे सांगितले असल्याची प्रतिक्रिया मोखाडा ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश गोडशेलवार यांनी दिली.
नाहरकत प्रमाणपत्राबाबतचा विषय आधी मासिक सभेत ठेवायला पाहिजे, मात्र तसे न करता ग्रामसभेत सदर विषय ठेवण्याचे कारण काय असा सवाल उपसरपंच संदीप जुनघरे यांनी उपस्थित करीत नाराजी व्यक्त केले आहे.