‘‘त्या’’ निर्दयी शिक्षकाला फाशीची शिक्षा दया : वंचित बहुजन आघाडी

 निवेदन तहसीलदारामार्फत पंतप्रधानांकडे

मूल (प्रतिनिधी) : माठामधील पाणी पिण्याच्या कारणावरून दलित विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करून विद्यार्थ्याच्या मृत्युस जबाबदार असलेल्या राजस्थान मधील जालौर येथील छैन सिंह या शिक्षकाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा मूलच्या वतिने करण्यात आली असुन त्यासंबधाचे निवेदन मूलचे तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांच्या मार्फतीने पंतप्रधान यांचेकडे पाठविण्यात आले आहे.

राजस्थान राज्यातील जालौर येथील एका विद्यार्थ्यांने शाळेत असलेल्या माठातील पाणी पिला, दलीत समाजाचा विद्यार्थी असल्याने त्याशाळेतील मुख्याध्यापक छैन सिंह यास याबद्दल राग आला, राग इतका अनावर झाला कि पाणी पिणाÚया विद्यार्थ्याला तो अमानुषपणे मारहान केले, यामारहाणीमुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यु झाला.

देशात मोठया उत्साहामध्ये अमृत महोत्सव साजरा करीत असतांना, एकीकडे दलीतांवरील अत्याचार वाढतच आहेत. अशा घटना देशाच्या लोकशाहीला कलंकीत असल्याने मुख्याध्यापक छैन सिंह यास भारतीय कायद्यानुसार फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी मूल शहर व तालुकाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका निरीक्षक डॉ. प्रविण गावतुरे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाळके, जिल्हा महासचिव मधुकर उराडे, मनोहर दुर्गे, शंकर दुधे, डेव्हिड खोब्रागडे यांनी दिला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.