38 रक्तदात्यांनी केले रक्तदान

सरपंच, शिक्षक आणि ग्रामसेवक संघटनेचा उपक्रम

सुधाकर दुधे, सावली
आझादी का अमृत महोत्सवानिमीत्य 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत पंचायत समिती, सावलीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर 18 ऑगष्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह पंचायत समिती, सावली येथे करण्यात आले. सदर रक्तदान शिबीराला 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सावलीच्या गट विकास अधिकारी तथा प्रशासक श्रीमती सुनीता मरस्कोल्हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन सावली पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार, गटशिक्षणाधिकारी खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रम दरम्यान वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, श्रमदान व स्वछता अभियान, बचत गटातील महिला व शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, गायन स्पर्धा व परिसंवाद आयोजित करण्यात आले. आणि 18 ऑगस्ट  रोजी सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

सदर रक्तदान शिबिराला तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमादरम्यन पंचायत समिती येथिल अधिकारी, कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

रक्तदान शिबीराला अल्प प्रतिसाद
रक्तदान शिबीराचे आयोजन करणाऱ्या संघटनेचे शेकडो सभासद आहेत, मात्र रक्तदान शिबीरात शिक्षण विभागतील 18, ग्रामसेवक संघटना ३, सरपंच व उपसरपंच ३, शिपाई ३, ग्राम पंचायत सदस्य 5, आय सी डी एस २, व ग्रामस्थ ४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.