काटवन येथील घटना
मूल (प्रतिनिधी) : चराईसाठी गुरे घेवुन जंगलात गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील काटवन कक्ष क्रं. 773 येथे बुधवारी दुपारी 2 वाजता दरम्यान घडली. त्याचावर उपचार सुरू असताना गुरूवारी सकाळ 11.45 वाजता दरम्यान त्याचा मृत्यु झाला. भाऊराव वतु गेडाम वय 55 वर्षे रा. काटवण असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नांव आहे.
मूल तालुक्यातील काटवण हे गांव बफर क्षेत्रात येतो, गावाला लागुनच जंगलव्याप्त परिसर आहे. काटवण येथील बहुतांष नागरीक शेती करीत असल्याने अनेकांकडे गुरे आहेत, गुरे चराईसाठी गावातीलच काही जण जंगलात नेत असतात, बुधवारी भाऊराव वतु गेडाम यांचेसह दोन गुराखी मारोडा 2 बिटातील काटवण येथील कक्ष क्रमांक 773 मध्ये गेले होते, दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने भाऊराव वतू गेडाम वय 55 वर्षे यांच्यावर हल्ला करून जखमी केले, सोबत असलेल्या गुराख्यानी आरडाओरड केल्याने वाघ पडुन गेला, दरम्यान दोन्ही गुराख्यानी गावात माहिती दिली, वनविभागाच्या पथकानी जखमी अवस्थेत असलेल्या भाऊराव गेडाम यांना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले, मात्र गंभीर जखमी असल्याने त्याला चंद्रपूर येथे उपचारार्थ पाठविण्यात आले, उपचार सुरू असताना गुरूवारी सकाळी 11.45 वाजता दरम्यान त्याचा मृत्यु झाला. मृत्तकाच्या कुटुंबियाना वनविभागान पन्नास हजार रूपयाची आर्थीक मदत केली. सदर मदत असुन नुकसान भरापई मिळेलच असा गैरसमज करू नये असे आवाहन वनविभागाने केले आहे.
विनापरवानगी जंगलात कुणीही जावु नये: घनश्याम नायगमकर
बफरझोन परिसरात मोठया प्रमाणावर वन्यप्राणी असल्याने कोणीही जंगलात जावु नये, याबाबत वनविभागाने गुराख्याना पत्र दिलेले आहे, कुणीही विनापरवानगी जंगलात गेल्यास वनविभाग जबाबदार राहणार नाही असे आवाहन वनविभागाच्या बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम नायगमकर यांनी केले आहे.