ध्वजारोहण उत्साहात: विद्यार्थ्यांना वृक्षभेट
गोंडपिपरी (प्रतिनिधी) : तिरंगा हा प्रत्येक भारतीयांची शान आहे .देशभक्तीचे तिरंगा प्रतीक असून त्याच्या सुरक्षेसाठी जीवाला उद्गार होण्यासाठीदेखील कुणी मागेपुढे पाहणार नाही.अशा राष्ट्रध्वजाची ७५ व्या सुवर्ण वर्षी देशभरात आझादी गौरव अभियान हर घर तिरंगा मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे.
शासकीय यंत्रणेकडून तर काहींनी स्वता तिरंगा घेऊन आप आपल्या घरावर तिरंगा लावलेला दिसत आहे. वढोलीत शंभराहून अधिक घराच्या छतावर तिरंगा दिसत आहे. सदर अभियान उत्फुर्तपणे नागरीकांनी सहभाग घेतला. सरस्वती विद्यालयात हरित सेनेतर्फे विध्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. सोबतच जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत, सरस्वती विद्यालय ,माता जगदंबा शेतकी शाळेने उत्साहात ध्वजारोहण पार पाडले. या उत्साहात विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य, कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, विध्यार्थी, आशा वर्कर, बचत गटाचे पदाधिकारी युवक युवती गावातील प्रतिष्टीत नागरिक सहभागी झाले होते.